मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ऐन लग्नमंडपात नवरीने नकार दिला तरी टेन्शन नको, तुमचा खर्च होईल कव्हर?

ऐन लग्नमंडपात नवरीने नकार दिला तरी टेन्शन नको, तुमचा खर्च होईल कव्हर?

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

जर लग्न रद्द केले गेले, तर आपल्याला अनेक प्री-बुक केलेल्या सेवांचे कॅन्सलेशन फी आणि आगाऊ फी जमा करावी लागू शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : भारतात लग्न हा नुसता विधी नाही तर मोठा सोहळा असतो. भारताची लग्ने त्यांच्या भव्यतेसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. लोक या लग्नांवर भरपूर पैसे खर्च करतात. अनेकदा लोक खर्चाच्या बाबतीत कोणत्याच गोष्टी बघत नाहीत. कर्ज काढून लग्न केलं जातं. त्यामुळे भारतात लग्न रद्द करणं खूप कठीण आहे. काही कारणाने लग्न रद्द केलं तर पैसे फुकट जातात. असं चुकून झालंच तर त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारीही ठेवायला हवी.

जर लग्न रद्द केले गेले, तर आपल्याला अनेक प्री-बुक केलेल्या सेवांचे कॅन्सलेशन फी आणि आगाऊ फी जमा करावी लागू शकते. अशा परिस्थितीत, लग्नाचा विमा आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. व्यावसायिक वेडिंग प्लॅनर्स त्यांच्या ग्राहकांना ते खरेदी करण्यास प्रोत्साहित करतात.

जर तुम्ही 20 लाख रुपयांचे सम अॅश्युअर्ड कव्हर घेतले तर तुम्हाला प्रीमियम म्हणून 2,000 ते 20,000 रुपये भरावे लागू शकतात. आता लग्न रद्द झाल्यास कोणत्या परिस्थितीत ते रद्द झाले यावर तुम्हाला इंश्युरन्स द्यायचा की नाही ते ठरवलं जातं. कोणत्याही नैसर्गिक आपत्ती, आग आणि दंगलीमुळे लग्न रद्द झालं तर तुम्हाला ही रक्कम मिळते.

Marriage Muhurat : करा हो लगीनघाई! 2023 सालातील लग्नाचे सर्व शुभ मुहूर्त एका क्लिकवर

वर, वधू किंवा त्यांच्या नातेवाईकांपैकी कुणीचंही निधन झालं किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे चोरीला गेल्यास लग्न रद्द करण्यात आलं तर कव्हर मिळत नाही. नातेवाईकांच्या निधीअभावी लग्न थांबवणे, वर किंवा वधू विवाहापर्यंत न पोहोचणे किंवा विवाहाला कोर्टाचे आदेश किंवा समन्स बजावण्यात आला आणि अशा परिस्थिती लग्न रद्द करावं लागलं तर कव्हर मिळत नाही.

बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स सीटीओ टी.ए. रामलिंगम म्हणतात की प्रीमियमची रक्कम विमा कंपनी आणि आपण निवडलेल्या कव्हर प्लॅनवर अवलंबून असते. "आमच्या धोरणात विविध पैलूंचा समावेश आहे. प्रीमियम कव्हरवर अवलंबून असतो, जसे की लग्न रद्द करणे, मालमत्तेचे नुकसान आणि चोरी इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.

झटपट पैसे कमवण्यासाठी लग्नसराईत करा 'हा' व्यवसाय

विमा उद्योगाशी संबंधित एका तज्ज्ञाच्या मते, भारतात याला फारशी पसंती नाही. सहसा, ज्या लग्नांचा खर्च 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असतो अशा लग्नांमध्ये लग्नाचा विमा काढला जातो. लग्न रद्द करणं हे खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे सगळ्या शक्यतांचा विचार करूनच ते भारतात केलं जातं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र अशा प्रकारचे विमा घेणं जास्त प्रसिद्ध आहे. अजूनतरी भारतात सगळे हा विमा घेत नाही. याचं प्रमाण कमी आहे.

First published:

Tags: Insurance, Wedding, Wedding rules