LPG Gas Cylinder: घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर आजपासून लागू, महागाईच्या काळात सामान्यांना दिलासा

LPG Gas Cylinder: घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर आजपासून लागू, महागाईच्या काळात सामान्यांना दिलासा

देशभरात वाढणाऱ्या महागाईच्या काळात डिसेंबर महिन्यात देखील एलपीजी घरगुती गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder Price 01 September 2020) च्या किंमतींबाबत सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 डिसेंबर: देशभरात वाढणाऱ्या महागाईच्या काळात डिसेंबर महिन्यात देखील एलपीजी घरगुती गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder Price 01 September 2020) च्या किंमतींबाबत सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) एलपीजी घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल केले नाही आहेत. 1 डिसेंबरपासून हे नवे दर लागू होत आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातही घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतेही बदल झाले नव्हते. दरम्यान 19 किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरमध्ये (Commercial Gas Cyliner Price) 55 रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे.

LPGच्या किंमतीत जुलैमध्ये झाली होती शेवटची वाढ

याआधी जुलै 2020 महिन्यात 14 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरची किंमत साधारण 4 रुपयांपर्यंत वाढली होती. जून महिन्यात दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम सबसिडी नसणाऱ्या एलपीजी सिलेंडरची किंमत 11.50 रुपयांनी वाढली होती. मे मध्ये एलपीजी 162.50 रुपयांपर्यंत स्वस्त झाला होता.

काय आहेत नवे दर (LPG Price in India 01 November 2020)-

देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी IOC च्या वेबसाइटच्या मते मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती स्थीर आहेत. मुंबईमध्ये 14.2 किलोग्रॅम सबसिडी नसणाऱ्या घरगुती गॅसची किंमत 594 रुपयांवर स्थीर आहे. जून आणि जुलै महिन्यात घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या होत्या. परंतू ऑगस्टपासून किंमती स्थीर ठेवण्यात आल्या आहेत.

(हे वाचा-पैसे पाठवण्यापासून ते रेल्वेप्रवासापर्यंत, आजपासून तुमच्या आयुष्यात होणार हे बदल)

मुंबईसह अन्य शहरांमध्ये देखील किंमती स्थीर ठेवण्यात आल्या आहेत IOC च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार या किंमती आहेत. दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम सबसिडी नसणाऱ्या घरगुती गॅसची किंमत 594 रुपये आहे. कोलकाता आणि चेन्नईमध्ये या किंमती अनुक्रमे 620.50 आणि 610 रुपये आहे.

कमर्शिअल गॅसच्या किंमती वाढल्या

डिसेंबर महिन्यात 19 किलोग्रॅम कमर्शिअर गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये सर्वाधिक 56 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. याठिकाणी कमर्शिअल गॅस सिलेंडरसाठी 1410 रुपये द्यावे लागतील. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 55 रुपयांची वाढ होऊन 19 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत 1296 रुपये आहे. मुंबई आणि कोलकातामध्ये देखील 55 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर दोन्ही शहरात अनुक्रमे किंमती 1351 रुपये आणि 1244 रुपये आहेत.

कसे तपासाल LPG गॅस सिलेंडरचे नवे दर

घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर तपासण्यासाठी तुम्ही सरकारी तेल विपणन कंपनीच्या वेबसाइटवर जाऊ शकता. याठिकाणी कंपनीकडून दर महिन्याचे रेट्स जारी केले जातात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर जाऊन तुम्ही तुमच्या शहरातील दाम तपासू शकता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 1, 2020, 9:43 AM IST
Tags: gasmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading