मुंबई, 01 फेब्रुवारी: आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी संसदेत येत्या आर्थिक वर्षाचं बजेट म्हणजेच अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केलं. दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वीच सरकारनं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला. तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात (commercial gas cylinder price) कपात केली आहे. इंडियन ऑइलनं (IOC) 19 किलोच्या कमिर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत 91.5 रुपयांची कपात केली आहे. किमतीत घट झाल्यानंतर दिल्लीमध्ये 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत एक हजार 907 रुपयांवर आली आहे. गेल्या (जानेवारी) महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या दरांत वाढ झाली नव्हती. आज फेब्रुवारी महिन्याचा पहिला दिवस आहे. या पार्श्वभूमीवर तेल विपणन कंपन्यांनी (Oil marketing companies) फेब्रुवारी महिन्यासाठी घरगुती गॅसच्या किमतीसुद्धा (LPG Gas Cylinder Price) जाहीर केल्या आहेत. विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. हे वाचा- Budget 2022 : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त? आणि काय महाग? वाचा सविस्तर… घरगुती गॅसच्या किमती दिल्लीमध्ये 14.2 किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 899.50 रुपये आहे. कोलकात्यात एलपीजी सिलेंडरची किंमत 926 रुपये तर मुंबईत 899.50 रुपये आहे. चेन्नईमध्ये विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 915.50 रुपये इतकी आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती दिल्लीमध्ये 19 किलो वजनाच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये 91.5 रुपयांनी घट होऊन ती एक हजार 907 रुपयांवर आली आहे. कोलकातामध्ये कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 89 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे कोलकात्यामध्ये एक हजार 987 रुपयांना सिलेंडर मिळत आहे. मुंबईमध्ये (Mumbai LPG Gas Cylinder Price) कमिर्शियल गॅस सिलिंडरची किंमत एक हजार 857 रुपयांवर आली आहे. मुंबईतसुद्धा सिलेंडरच्या किमतीमध्ये 91.5 रुपयांची घट झाली आहे. तर, चेन्नईमध्ये 19 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची किंमत दोन हजार 80 रुपये 5 पैशांवर गेली आहे. हे वाचा- Income Taxpayers या अर्थसंकल्पातून काय मिळाले? काय आहेत बजेटमधील मोठ्या घोषणा या ठिकाणी तपासा एलपीजीचे दर एलपीजी सिलेंडरची किंमत जाणून घेण्यासाठी सरकारी तेल कंपनी IOCच्या वेबसाइटवर जावं लागेल. या ठिकाणी कंपन्या दर महिन्याला गॅसच्या नवीन किंमती जारी करतात. इंडियन ऑइलच्या https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर क्लिक करून तुमच्या शहरातील गॅस सिलेंडरची किंमत जाणून घेऊ शकता. नवीन कंपोझिट गॅस सिलेंडर लाँच इंडियन ऑइलनं आपल्या ग्राहकांसाठी एक एलपीजी सिलेंडर लाँच केलं आहे. त्याला कंपोझिट सिलेंडर (Composite cylinder) असं नाव देण्यात आलं आहे. हे सिलेंडरमध्ये तीन स्तर आहेत. आतील पहिला थर उच्च घनता असलेल्या पॉलिथिलीनचा (Polyethylene) बनलेला असेल. त्याला वरून पॉलिमरपासून बनवलेल्या फायबरग्लासचा कोट देण्यात आला आहे. सर्वात बाहेरचा थर एचडीपीईचा बनलेला आहे. पुढील महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढणार की आणखी कमी होणार हे, आज बजेट सादर झाल्यानंतर स्पष्ट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.