Home /News /money /

आता LPG गॅस सिलेंडरवर मिळवा 100 रुपयांपर्यंतची सूट, वाचा कसा मिळवाल फायदा

आता LPG गॅस सिलेंडरवर मिळवा 100 रुपयांपर्यंतची सूट, वाचा कसा मिळवाल फायदा

LPG घरगुती गॅसचे दर सध्या गगनाला भिडले आहे. सामान्यांच्या आवाक्याबाहेर गॅसचे भाव गेल्याने प्रत्येकजण पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला देखील काहीसा दिलासा मिळवायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जेणेकरून एलपीजी गॅसच्या वाढणाऱ्या किंमतीपासून काहीशी सूट मिळवू शकता

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 10 मार्च: पेट्रोल-डिझेल पाठोपाठच गेल्या काही महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरचे (LPG Gas Cylinder Price) दर वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला चाप बसत आहे. गेल्या दोन महिन्यात गॅसचे दर साधारण 125 रुपयांनी वधारले आहेत. अशावेळी ही किंमत चुकवताना काहीशी सूट मिळवण्याचा प्रयत्न ग्राहक करतात. तुम्हाला देखील अशी सूट हवी असेल तर तुम्ही काही डिजिटल पेमेंट अॅप्सचा (Digital Payment Apps) वापर करून ही सवलत मिळवू शकता. एलपीजी गॅस सिलेंडर विकत घेताना तुम्ही पेटीएम (Paytm) वरून पेमेंट करत असाल तर तुम्हाला यामध्ये 100 रुपयांपर्यंत सूट मिळेल. पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार, पेटीएमच्या माध्यमातून पहिल्यांदा गॅस सिलेंडर बुक करणाऱ्यांना 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. तुम्ही पेमेंट केल्यानंतर एक स्क्रॅचकार्ड दिलं जाईल, ते स्क्रॅच केल्यानंतर तुम्हाला किती कॅशबॅक मिळाला आहे हे तुम्हाला समजेल. हा कॅशबॅक 100 रुपयांपर्यंत आहे, त्यामुळे तो या किंमतीपेक्षा कमी देखील असू शकतो. या ऑफरचा फायदा तुम्हाला 31 मार्चपर्यंत घेता येणार आहे (हे वाचा-44000 रुपयांहून खाली उतरला सोन्याचा भाव तर चांदी महागली) ...तर मिळणार नाही कॅशबॅक ही सूट मिळवण्यासाठी पेटीएमने काही अटी व शर्ती लागू केल्या आहेत. जे पहिल्यांदा पेटीएमवरून सिलेंडर बुक करत आहेत, त्यांनाच हा फायदा मिळणार आहे. तुम्ही या आधी पेटीएमवरून बुकिंग केलं असेल तर तुम्हाला एलपीजी गॅसच्या किंमतीत सवलत मिळणार नाही. तुम्ही 31 मार्चपर्यंतच ही ऑफर मिळवू शकतो. पेमेंट केल्यानंतर जे स्क्रॅचकार्ड मिळेल ते 7 दिवसांत स्क्रॅच करणं अनिवार्य आहे अन्यथा ते वैध राहणार नाही. स्क्रॅच केल्यानंतर जी रक्कम तुम्हाला कॅशबॅक स्लरुपात मिळणार आहे ती 24 तासांत तुमच्या पेटीएम वॉलेटमध्ये जमा होईल. (हे वाचा-15 मार्चला आहे मोठी कमाई करण्याची संधी! इतके पैसे गुंतवणून मिळवा मोठा फायदा) Amazon वर देखील 50 रुपयांपर्यंचा कॅशबॅक इंडियन ऑइलने ट्वीट करून अशी माहिती दिली आहे की, जर तुम्ही इंडेनचा एलपीजी गॅस सिलेंडर Amazon वरुन बुक कराल तर तुम्हाला 50 रुपये कॅशबॅक मिळेल. याकरता तुम्हाला अॅमॅझॉन पेच्या माध्यमातून पेमेंट करावं लागेल. यानंतर कॅशबॅक तुमच्या वॉलेटमध्ये जमा होईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gas, LPG Price

    पुढील बातम्या