Home /News /money /

15 मार्चला आहे मोठी कमाई करण्याची संधी! इतके पैसे गुंतवणून मिळवा मोठा फायदा

15 मार्चला आहे मोठी कमाई करण्याची संधी! इतके पैसे गुंतवणून मिळवा मोठा फायदा

लक्ष्मी ऑर्गेनिक्स (Laxmi Organic IPO) चा आयपीओ 15 मार्च रोजी बाजारात येत आहे. तुम्ही याआधी आलेल्या आयपीओमध्ये गुंतवणूक केली नसेल तर तुमच्यासाठी आणखी एक संधी आहे. 17 मार्चपर्यंत ही गुंतवणूक करता येईल.

    नवी दिल्ली, 09 मार्च: लक्ष्मी ऑर्गेनिक्स (Laxmi Organic IPO)चा आयपीओ 15 मार्च रोजी बाजारात येत आहे. तुम्ही याआधी आलेल्या आयपीओमध्ये गुंतवणूक (Invest in IPO) केली नसेल तर तुमच्यासाठी आणखी एक संधी आहे. 17 मार्चपर्यंत ही गुंतवणूक करता येईल. कंपनीकडून आयपीओचा प्राइस बँड देखील निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओमध्ये 300 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स जारी केले जाणार आहेत. तर प्रमोटर्स येलो स्टोन ट्रस्टद्वारे 300 कोटींच्या शेअर्सची विक्री ऑफर फॉर सेलअंतर्गत केली जाणार आहे. -लक्ष्मी ऑर्गेनिक्सने आयपीओसाठी प्राइस बँड 129-130 रुपये निश्चित केला आहे. -आईपीओ लॉट साइझ 115 शेअर्सची निश्चित करण्यात आली आहे. - प्राइस बँड 130 रुपयांच्या हिशेबाने गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये कमीतकमी 14950 रुपये गुंतवणे आवश्यक आहे. कंपनीला किती पैसे मिळणार? प्री-आयपीओ प्लेसमेंटनंतर कंपनीची इश्यू साइझ 800 कोटी रुपयांवरून 600 कोटींवर आहे. प्री-आयपीओ प्लेसमेंटद्वारे 1,55,03,875 इक्विटी देऊन कंपनीने 200 कोटी रुपये जमा केले आहेत. यामुळे फ्रेश इश्यूची साइझ 500 कोटी रुपयांवरून 300 कोटी रुपये झाली आहे. (हे वाचा-सोनेखरेदीची सुवर्णसंधी! आतापर्यंत 12000 रुपयांनी उतरले दर, इथे तपासा आजचा भाव) कंपनी फंडचा वापर कुठे करणार? आयपीओमार्फत जमा झालेल्या निधीचा वापर कंपनीच्या संपूर्ण मालकीच्या सहाय्यक कंपनी यलोस्टोन फाईन केमिकल (YFCPL) मध्ये करेल. या युनिटमध्ये गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. या व्यतिरिक्त निधीचा काही भाग कार्यरत भांडवल आणि उत्पादनातही वापरला जाईल. जाणून घ्या कंपनीविषयी Laxmi Organic एथाइल एसेटेट (ethyl acetate) मार्केटमधील एक मोठी उत्पादक कंपनी आहे. भारताच्या एथाइल मार्केटमध्ये कंपनीची भागीदारी 30 टक्के आहे. वायसीपीएलचे अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या बाजारपेठेत आणखी वाढ होईल. भारतात diketene derivatives बनविणारी ही एकमेव कंपनी आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Investment, Money, Small investment business

    पुढील बातम्या