मराठी बातम्या /बातम्या /मनी /गॅस सिलिंडर पोहोचवणाऱ्या व्यक्तीने जादा पैसे मागितले तर काय कराल?

गॅस सिलिंडर पोहोचवणाऱ्या व्यक्तीने जादा पैसे मागितले तर काय कराल?

तुमच्याकडे दरमहा सिलिंडर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयने मागणी केल्यावर जादाचा डिलिव्हरी चार्ज म्हणून तुम्ही त्याच्या हातावर 5 किंवा 10 रुपये टेकवता. पण आता आधी ही बातमी वाचा

तुमच्याकडे दरमहा सिलिंडर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयने मागणी केल्यावर जादाचा डिलिव्हरी चार्ज म्हणून तुम्ही त्याच्या हातावर 5 किंवा 10 रुपये टेकवता. पण आता आधी ही बातमी वाचा

तुमच्याकडे दरमहा सिलिंडर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयने मागणी केल्यावर जादाचा डिलिव्हरी चार्ज म्हणून तुम्ही त्याच्या हातावर 5 किंवा 10 रुपये टेकवता. पण आता आधी ही बातमी वाचा

  नवी दिल्ली, 6 जानेवारी: घरगुती सिलिंडरची नोंदणी, मग सिलेंडर वेळेत मिळणं, सिलिंडर पोहोचवणाऱ्याने कटकट न करता घरपोच आणून देणे या आजच्या काळातही अनेक जणांच्या घरातले डोकेदुखी ठरू शकतील असे विषय. पुन्हा गॅस सिलेंडरवाला पावती कमीची देतो आणि मागतो जास्त पैसे, असा अनुभव तुम्हाला आला असेल आणि जर तुम्ही हिंदुस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड (HPCL) कंपनीचा एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder) वापरत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

  तुमच्याकडे दरमहा सिलिंडर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयने मागणी केल्यावर जादाचा डिलिव्हरी चार्ज म्हणून तुम्ही त्याच्या हातावर 5 किंवा 10 रुपये टेकवता. पण कंपनीनी आता स्पष्टपणे सांगितलं आहे की, डिलिव्हरी बॉयला अजिबात पैसे देऊ नका.

  डिलिव्हरी चार्ज का द्यायचा नाही?

  माहिती अधिकारात (Right to information) गॅस उत्पादक कंपनी HPCL ला डिलिव्हरी चार्जेसबद्दल माहिती विचारण्यात आल्यानंतर एचपीसीएलनी या RTI ला उत्तर देताना हे स्पष्ट केलं आहे की, डिस्ट्रिब्युटरने ग्राहकाच्या दारात गॅस सिलिंडर पोहोचवणं ही त्याची जबाबदारी आहे. ग्राहकाचं घर कोणत्याही बिल्डिंगमध्ये कितव्याही मजल्यावर असलं तरीही त्याच्याकडून जादाचे चार्जेस घेऊ नयेत, असं कंपनीनेच स्पष्ट केलं आहे.

  2021 मध्ये हे IPO तुम्हाला करतील मालामाल, या कंपन्यांमध्ये करू शकता गुंतवणूक

  बिलात दिलेली रक्कमच ग्राहकाने भरायची आहे. हैदराबादेतील करीन अन्सारी यांनी आरटीआय (Right to information) अंतर्गत एचपीसीएलला माहिती विचारली होती. डिलिव्हरी बॉयने अन्सारी यांना जादाचे पैसे मागितल्यानंतर त्यांनी ही माहिती मागितली होती.

  नियमांनुसार डिलिव्हरी बॉयला जादा पैसे देणं बंधनकारक नाही. बिलात दिलेली रक्कमच ग्राहकानी द्यायची आहे. ग्राहक डिलिव्हरी बॉयला पैसे द्यायला नकार देऊ शकतात. जर तुमच्याकडे जादा पैशांची मागणी केली गेली तर ग्राहक डिस्ट्रिब्युटरकडे त्या डिलिव्हरी बॉयची तक्रार करू शकतो, असं एचपीसीएलने म्हटलं आहे.

  कॅनरा बँकेतून पैसे घेण्यासाठी पोहोचला मृत व्यक्ती, 3 तास थांबला आणि....

  गॅस हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. एलपीजीमुळे मोठ्या प्रमाणात वेळ वाचतो स्वच्छ वातावरणात स्वयंपाक होतो त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उज्ज्वला योजनेअंतर्गत घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचवले आहेत. गॅस सिलिंडर वितरणावेळी जादा पैशांची मागणी कायद्याने योग्य नाही त्यामुळे पुढच्यावेळी जेव्हा तुमचा सिलिंडर घेऊन माणूस येईल तेव्हा तुम्ही त्याला जादा पैसे द्यायला नकार देऊ शकता. आणखी एक पर्याय आहे तुमचं सिलिंडरचं बिल डिजिटल पद्धतीने भरलंत तर प्रश्नच मिटला.

  First published: