मराठी बातम्या /बातम्या /मनी /कॅनरा बँकेतून पैसे घेण्यासाठी पोहोचला मृत व्यक्ती, 3 तास थांबला आणि....कर्मचाऱ्यांची उडाली धांदल

कॅनरा बँकेतून पैसे घेण्यासाठी पोहोचला मृत व्यक्ती, 3 तास थांबला आणि....कर्मचाऱ्यांची उडाली धांदल

ते तीन तास इथल्या कर्मचाऱ्यांसह आणि ग्राहकांसाठीही अवघड होते. वाचा काय आहे प्रकरण..

ते तीन तास इथल्या कर्मचाऱ्यांसह आणि ग्राहकांसाठीही अवघड होते. वाचा काय आहे प्रकरण..

ते तीन तास इथल्या कर्मचाऱ्यांसह आणि ग्राहकांसाठीही अवघड होते. वाचा काय आहे प्रकरण..

पाटना, 6 जानेवारी : बिहारची राजधानी पाटना येथील एका गावात एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. या गावात मृत व्यक्ती त्याचे पैसे घेण्यासाठी बँकेत आली. त्याला बँकेत पाहून कर्मचार्‍यांना मोठा धक्का बसला. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेलं, मात्र ही घटना खरी आहे.

तर हा विचित्र प्रकार पाटना शहराजवळील शाहजहांपूर पोलीस ठाणे हद्दीतील सिगरियावा येथील आहे. येथे कॅनरा बँकेची (Canara Bank) शाखा आहे. तर झालं असं की, सिगरियावा गावाचे निवासी 55 वर्षीय महेश यादव यांचा मंगळवारी सकाळी आजारामुळे मृत्यू झाला. मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांनी बँकेत जाऊन अधिकाऱ्यांकडे त्यांच्या खात्यातील पैसे मागितले. ( dead man reached to get the money from the bank) मात्र बँक मॅनेजरने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे नाकार होऊन गावकरी महेश यादव यांचा मृतदेह बँकेत घेऊन गेले. त्यांनी महेश यांचा मृतदेह थेट बँकेच्या गेटच्या आता जाऊन ठेवला. हे सर्व पाहून बँक कर्मचाऱ्यांसह तेथील ग्राहकांनाही मोठा धक्का बसला. हा प्रकार पाहून बँक मॅनेजरही हैराण झाले. तब्बल 3 तास महेश यांचा मृतदेह बँकेत पडून होता. मात्र गावकऱ्यांनीही कर्मचाऱ्यांच ऐकलं नाही. त्यानंतर मात्र बँक मॅनेजरला आपल्या खिशातून 10000 रुपये द्यावे लागले, तेव्हा कुठे गावकरी शांत झाले. ( dead man reached to get the money from the bank)

हे ही वाचा-नियम तोडले या पठ्ठ्याने आणि दंड बसला प्रसिध्द उद्योगपती रतन टाटांना!

पैसे मिळाल्यानंतर गावकरी मृत महेश यादव यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले. महेश यांचं लग्न झालं नव्हतं आणि त्यांच्या पुढे-मागे कोणी नातेवाईकही नाही. त्यांच्या बँक खात्यात 1 लाख 18000 रुपये होते. मात्र बँक खात्यात त्यांचा कोणी नॉमिनीही नव्हतं. इतकच नाही तर त्यांची KYC देखील जमा करण्यात आली नव्हती. या कारणाने बँकेने त्यांचे पैसे देण्यास नकार दिला होता. आजतकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

कॅनरा बँकेचे मॅनेजर संजीव कुमार यांनी सांगितलं की, गावकरी महेशचे पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पैशांची गरज होती. पण बँकेची ठराविक प्रक्रिया आहे. त्यांच्या मते, तो त्यांना पैसे देऊ शकला नाही. कारण त्याच्या खात्याचे कोणी नॉमिनी नव्हते. मृताचेही केवायसी नव्हते. त्याच्या मृत्यूची कागदपत्रे आल्यावर त्याच्या क्लेमरला पैसे दिले जातील.

First published: