जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LIC पॉलिसीवर स्वस्तात मिळतो पर्सनल लोन; तुम्हाला माहितेय का याबाबत?

LIC पॉलिसीवर स्वस्तात मिळतो पर्सनल लोन; तुम्हाला माहितेय का याबाबत?

LIC

LIC

अचानक उद्भवलेल्या संकटाच्या काळात आर्थिक मदत मिळावी म्हणून, इन्शुरन्स पॉलिसी घेतल्या जातात. भविष्यातील फायनॅन्शियल सिक्युरिटीसाठी एलआयसी पॉलिसींना सर्वांत सेफ पर्याय मानलं जातं.

  • -MIN READ Trending Desk Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 28 ऑक्टोबर-   अचानक उद्भवलेल्या संकटाच्या काळात आर्थिक मदत मिळावी म्हणून, इन्शुरन्स पॉलिसी घेतल्या जातात. भविष्यातील फायनॅन्शियल सिक्युरिटीसाठी एलआयसी पॉलिसींना सर्वांत सेफ पर्याय मानलं जातं. एलआयसी वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फायदे देणाऱ्या पॉलिसी घेऊन येते. एलआयसीनं आता आपल्या ग्राहकांसाठी एक लोन स्कीम सुरू केली आहे. तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी असल्यास, तुम्ही आपल्या पॉलिसीवर वैयक्तिक कर्जासाठी म्हणजेच पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकता. या प्रकारच्या वैयक्तिक कर्जावर सरकारी आणि खासगी बँकांच्या तुलनेत खूपच कमी व्याजदर आहे. पॉलिसीवर एलआयसीद्वारे ऑफर केलेल्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर 9 टक्क्यांपासून सुरू होतो. तुम्हाला पॉलिसीवर किती कर्ज मिळेल हे तुमच्या उत्पन्नानुसार ठरवलं जातं. एलआयसी पॉलिसीवर मिळणाऱ्या लोनबाबत या ठिकाणी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पॉलिसीवर लोन कसं घ्याल? जर तुम्हाला एलआयसी पॉलिसीवर पर्सनल लोन घ्यायचं असेल, तर तुम्ही एलआयसीच्या वेबसाइटवर जाऊन सखोल माहिती घेऊ शकता. तिथे तुम्ही लोनसाठी अर्जही करू शकता. लोनसाठी असलेला ऑनलाइन फॉर्म भरून तो डाउनलोड करा. भरलेल्या फॉर्मवर सही केल्यानंतर, तो स्कॅन करा आणि एलआयसीच्या वेबसाइटवर अपलोड करा. यानंतर तुमच्या अर्जाची विमा महामंडळाकडून पडताळणी केली जाईल. तुम्ही लोन मिळण्यासाठी पात्र असाल तर लोन देण्याची प्रक्रिया सुरू होईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, लोनची संपूर्ण रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल. (हे वाचा: पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यावर कोण भरणार प्रीमियम? काय आहे LIC चं धोरण **)** पॉलिसी लोनसाठी कमी व्याजदर एलआयसी पॉलिसीवर घेतलेल्या पर्सनल लोनवर इतर वित्तीय संस्थांच्या तुलनेत कमी व्याजदर आहे. सध्या, त्याचा व्याजदर नऊ टक्क्यांपासून सुरू होतो आणि लोनची मुदत पाच वर्षे आहे. या पर्सनल लोनची खास गोष्ट म्हणजे, जर तुम्ही मुदतीपूर्वी सर्व लोन परत केलं तर त्यावर अतिरिक्त चार्ज लागत नाही. म्हणजेच, मुदतीपूर्वी लोनची परतफेड केल्यास तुम्हाला एक रुपयाही जास्त भरावा लागणार नाही. किती ईएमआय भरावा लागेल? पॉलिसी लोनवरील ईएमआयबद्दल बोलायचं झाल्यास, जर एखाद्या व्यक्तीने एका वर्षाच्या कालावधीसाठी नऊ टक्के व्याजदरानं एक लाख रुपयांचं लोन घेतलं असेल, तर आठ हजार 745 रुपयांचा ईएमआय लागू होईल. जर दोन वर्षांसाठी लोन घेतलं असेल तर चार हजार 568 रुपये ईएमआय भरावा लागेल. पाच वर्षांसाठी घेतलेल्या लोनवर दोन हजार 76 रुपये ईएमआय भरावा लागेल. पाच लाख रुपयांचं लोन असल्यास किती ईएमआय भरावा लागेल? जर तुम्ही एका वर्षाच्या कालावधीसाठी पाच लाख रुपयांचं पर्सनल लोन घेतलं तर 44 हजार 191 रुपये ईएमआय असेल. याच रकमेवर दोन वर्षांच्या कालावधीसाठी 23 हजार 304 रुपये, तीन वर्षांसाठी 18 हजार 472 रुपये, चार वर्षांसाठी 15 हजार रुपये आणि पाच वर्षांसाठी 12 हजार 917 रुपये ईएमआय भरावा लागेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: LIC , money
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात