मराठी बातम्या /बातम्या /मनी /Mhada Lottery 2023 : रजिस्ट्रेशन ते घर घेण्यापर्यंत तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तर एका क्लिकवर

Mhada Lottery 2023 : रजिस्ट्रेशन ते घर घेण्यापर्यंत तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तर एका क्लिकवर

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यापासून ते घर घेण्यापर्यंत तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज इथे आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यापासून ते घर घेण्यापर्यंत तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज इथे आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यापासून ते घर घेण्यापर्यंत तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज इथे आम्ही तुम्हाला देणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई : तुमच्या स्वप्नातील घर आता प्रत्यक्षात उतरवण्याची ही संधी सोडू नका. कारण मुंबई, पुणे आणि नागपूरसाठी म्हाडाने लॉटरी आणली आहे. तुम्ही अजूनही यासाठी अर्ज केला नसेल तर तुमच्याकडे वेळ आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत  5 फेब्रुवारी असणार आहे. तर रजिस्ट्रेशननंतर पेमेंट भरण्याची मुदत 6 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यापासून ते घर घेण्यापर्यंत तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज इथे आम्ही तुम्हाला देणार आहोत.

    म्हाडाच्या घरासाठी कोणाला अर्ज करता येऊ शकतो?

    म्हाडाच्या घरासाठी अर्ज करायचा असेल तर तुमचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असायला हवं. दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं पॅनकार्ड आणि तुम्ही 15 वर्ष महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या नावावर घर असता कामा नये, नाहीतर तुमचं नाव लॉटरीमधून बाद होऊ शकतं

    म्हाडाच्या घरासाठी कुठे करायचा अर्ज?

    तुम्हाला जर घर घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही lottery.mhada.gov.in या वेबसाईटवर रजिस्टर करा. त्यानंतर तिथे अर्ज भरावा लागेल. रजिस्ट्रेशन केल्याशिवाय अर्ज भरता येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे लॉगइन डिटेल्स सेव्ह करून ठेवा. नव्या नियमानुसार आता तुम्हाला प्रत्येकवेळा वेगळं लॉगइन करावं लागणार नाही.

    महत्त्वाच्या तारखा कोणत्या?

    5 फेब्रुवारी - अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

    6 फेब्रुवारी- ऑनलाइन पेमेंटचा शेवटचा दिवस

    6 फेब्रुवारी- NEFT पेमेंटचा शेवटचा दिवस

    13 फेब्रुवारी - ड्राफ्ट अॅप्लिकेशन पब्लिश

    15 फेब्रुवारी- फायनल अॅप्लिकेशन

    17 फेब्रुवारी - लॉटरी ड्रॉ

    20 फेब्रुवारी - रिफंड

    Pune Mhada Lottery 2023 : पुण्यात बजेटमधील घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी, पाहा काय आहेत अटी

    कोणती कागदपत्र लागतात?

    म्हाडा यावेळी 21 कागदपत्रांऐवजी 7 कागदपत्र जमा करून घेणार आहे. याशिवाय यावेळी संपूर्ण लॉटरी प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. ओळखपत्र पुरावा- तुमच्याकडी एक ओळखपत्र, यामध्ये जर आधारकार्ड असेल तर त्यावर तुम्ही आता राहात असलेला पत्ता टाकणं आवश्यक आहे. तहसीलदार यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र, त्यावर क्यूआर कोड असणे आवश्यक.

    उत्पन्नाचा पुरावा आवश्यक आहे. त्यामध्ये उत्पन्नाचा दाखल तुमचं बँक स्टेटमेंट आणि सॅलरी स्लीप या गोष्टी तुम्हाला सोबत ठेवायच्या आहेत.जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही जर कोट्यातून अर्ज केला असेल तर तुम्हाला त्या कोटासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्र सादर करणं गरजेचं आहे. यासोबत स्वघोषणात्र देखील जोडावं लागेल.

    म्हाडाचं घर भाड्याने देता येतं का?

    म्हाडाचं घर तुम्ही भाड्याने देऊ शकता. आवश्यक ती कागदपत्र जमा करण्यासाठी एकदा वकिलांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

    म्हाडाचं घर विकता येतं का?

    तुम्ही कोट्यातून घर घेतलं असेल तर त्याची प्रक्रिया वेगळी आहे. म्हाडाचं घर तुम्हाला वाटलं तर विकू देखील शकता. जर लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला ते सोडावं वाटतं तरीही सोडता येऊ शकतं.

    Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेण्यासाठी भरावे लागणार दुप्पट पैसे?

    म्हाडाची 2 घरं लागल्यास ती विकत घेता येतात का?

    एकाच्या नावावर किंवा पती-पत्नी दोघांच्याही नावावर एक एक अशी दोन घरं लॉटरीमध्ये लागली तर दोन्ही घरं घेता येत नाहीत. याचं कारण पत्नी किंवा पती त्या घराचा सहमालक असतो. त्यामुळे एकावेळी एकच घर घेता येतं. तुम्हाला दोन घरं घ्यायची असतील तर तुम्ही मुंबई आणि नागपूर, किंवा मुंबई पुणे अशा दोन ठिकाणी अर्ज करून घरं घेऊ शकता.

    सिडकोचं घर असेल तर म्हाडाचं घर घेता येतं का?

    हो, तुमचं सिडकोचं घर असेल तरी तुम्ही म्हाडासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला म्हाडासाठी घर घेता येतं.

    म्हाडाचा अर्ज करताना अडचण आल्यास कुठे करायचा संपर्क?

    तुम्हाला म्हाडासाठी अर्ज करताना अडचणी आल्या तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तिथे तुमच्या शंकांचं निरसन करू शकता. तुम्ही 02226598924/9834637538 या म्हाडाच्या क्रमांकावर संपर्क करुन अडचणी सांगू शकता. याशिवाय न्यूज 18 लोकमतवरही तुम्हाला सोप्या शब्दात म्हाडा लॉटरी 2023 संदर्भातील सर्व बातम्या आणि माहिती मिळू शकते.

    First published:

    Tags: Mhada Lottery 2023, Mumbai, Pune, Sbi home loan