मुंबई, 12 सप्टेंबर : आधार कार्ड हे आजच्या काळातील आपले सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधारशिवाय आपली अनेक कामे अडकू शकतात. याशिवाय आधारशिवाय आपण कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. आधारमुळे अनेक सुविधा सहज सोप्या झाल्या असल्या तरी याद्वारे फसवणुकीच्या काही प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे आधारकार्डमधील वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली पाहिजे. UIDAI ने आधारच्या सुरक्षिततेसाठी बायोमेट्रिक्स लॉक अनलॉकची सुविध दिली आहे. ज्यामुळे आमची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते. विशेष म्हणजे गरज असेल तेव्हा आपण ते कधीही लॉक-अनलॉक करू शकतो. बायोमेट्रिक लॉक-अनलॉक हे एक फीचर आहे जे सर्व आधार धारकांना त्यांचे बायोमेट्रिक लॉक आणि तात्पुरते अनलॉक करण्यास परवानगी देते. या फीचरचा मुख्य उद्देश तुमच्या बायोमेट्रिक्स डेटाची फिंगर प्रिंट्स, आय स्कॅनची गोपनीयता राखणे आहे. नोकरी सोडल्यानंतर PF खात्यातील पैशांचं काय होतं? नुकसान टाळण्यासाठी या नियमांचं पालन करा बायोमेट्रिक्स लॉक केल्यानंतर, कोणतीही व्यक्ती ऑथोन्टिकेशनसाठी तुमचे आधार बायोमेट्रिक्स वापरू शकत नाही. एकदा ते लॉक झाल्यानंतर, ते अनलॉक केल्याशिवाय तुम्ही तुमचे आधार बायोमेट्रिक्स ऑथोन्टिकेशनसाठी वापरू शकत नाही. Fixed Deposit: फिक्स्ड डिपॉझिटमधील गुंतवणूक सुरक्षित, मात्र तुमचं नुकसान कसं होतं समजून घ्या आधार बायोमेट्रिक्स लॉक करण्यासाठी प्रोसेस » तुमच्या आधारचे बायोमेट्रिक लॉकिंग करण्यासाठी, सर्वप्रथम आधारच्या अधिकृत वेबसाइट https://resident.uidai.gov.in/bio-lock वर जा. » वेबसाइटवर आल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरील चेक बॉक्सवर क्लिक करावे लागेल, ज्यामध्ये असे लिहिले आहे की जोपर्यंत तुम्ही तुमचे बायोमेट्रिक अनलॉक करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन करू शकत नाही. » चेक बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर, लॉक/अनलॉक बायोमेट्रिक्सवर क्लिक करा. » लॉक/अनलॉक बायोमेट्रिक्स वर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. » या नवीन पेजवर आता तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि Send OTP वर क्लिक करावे लागेल. » आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल, हा OTP टाका आणि सबमिट वर क्लिक करा. तुम्ही सबमिट वर क्लिक करताच तुमचे आधार बायोमेट्रिक्स लॉक होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.