मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Fixed Deposit: फिक्स्ड डिपॉझिटमधील गुंतवणूक सुरक्षित, मात्र तुमचं नुकसान कसं होतं समजून घ्या

Fixed Deposit: फिक्स्ड डिपॉझिटमधील गुंतवणूक सुरक्षित, मात्र तुमचं नुकसान कसं होतं समजून घ्या

सर्वसामान्यपणे लोक बॅंक एफडी पूर्णपणे सुरक्षित मानतात; पण एफडीमधले पैसे सुरक्षित असले तरी बॅंक कोणत्याही कारणामुळे डिफॉल्टमध्ये गेली तर गुंतवणूकदारांची फक्त 5 लाखांपर्यंतची एफडी सुरक्षित राहते.

सर्वसामान्यपणे लोक बॅंक एफडी पूर्णपणे सुरक्षित मानतात; पण एफडीमधले पैसे सुरक्षित असले तरी बॅंक कोणत्याही कारणामुळे डिफॉल्टमध्ये गेली तर गुंतवणूकदारांची फक्त 5 लाखांपर्यंतची एफडी सुरक्षित राहते.

सर्वसामान्यपणे लोक बॅंक एफडी पूर्णपणे सुरक्षित मानतात; पण एफडीमधले पैसे सुरक्षित असले तरी बॅंक कोणत्याही कारणामुळे डिफॉल्टमध्ये गेली तर गुंतवणूकदारांची फक्त 5 लाखांपर्यंतची एफडी सुरक्षित राहते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 12 सप्टेंबर : सध्या बँका आपले फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे चांगला परताना ग्राहकांना एफडीवर मिळत आहे. त्यात फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणुकीचा अत्यंत सुरक्षित पर्याय मानला जातो. खात्रीशीर परतावा आणि कमी जोखीम ही यामागची कारणे आहेत. फिक्स्ड डिपॉझिटचे बॅंकांची एफडी योजना आणि कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट असे दोन प्रकार आहेत.

बॅंकांची फिक्स्ड डिपॉझिट योजना ही सर्वांत लोकप्रिय आहे. कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जास्त व्याज दिलं जातं. मात्र बॅंकाच्या तुलनेत यात जोखीम जास्त असते. फिक्स्ड डिपॉझिटवरील परताव्याच्या बाबतीत गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट असतो. परंतु, बहुतेक लोकांना त्याच्याशी संबंधित जोखमींबद्दल फारशी माहिती नसते. या जोखमींबद्दल जाणून घेणं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा तुम्हाला तुमच्या कष्टाचे पैसे बँकेकडून परत मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

#कायद्याचं बोला: खात्यातून 300 रुपये झाले वजा! विद्यार्थ्याने RBI निमयांच्या मदतीने कसे मिळवले तब्बल 9600 रुपये

सर्वसामान्यपणे लोक बॅंक एफडी पूर्णपणे सुरक्षित मानतात; पण एफडीमधले पैसे सुरक्षित असले तरी बॅंक कोणत्याही कारणामुळे डिफॉल्टमध्ये गेली तर गुंतवणूकदारांची फक्त 5 लाखांपर्यंतची एफडी सुरक्षित राहते. वित्तीय कंपन्यांसाठीदेखील हा नियम लागू आहे. डिपॉझिट इन्शुरन्स अ‍ॅंड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) फक्त 5 लाख रुपयांपर्यंतच्या बँक डिपॉझिटवर विमा हमी देते.

लिक्विडिटीची समस्या

तज्ज्ञांच्या मते, बॅंक एफडीमध्ये लिक्विडिटीची समस्या असते. जर अगदीच गरज असेल तर तुम्ही मुदतपूर्ती पूर्वीच एफडीतून पैसे काढू शकता. परंतु, त्यावर दंड आकारला जातो. एफडीवरील दंडाची रक्कम बँकेनुसार बदलू शकते. जर तुम्ही टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्ही त्यातून 5 वर्षांपूर्वी रक्कम काढू शकता. परंतु, अशावेळी तुम्हाला आयकरात सवलत मिळत नाही.

Loan on PPF: पीपएफ खात्यावर सहज मिळवा स्वस्त लोन, कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

महागाईच्या तुलनेत परतावा नाही

फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणारा व्याजदर हा पूर्वनिर्धारित असतो. त्याचवेळी महागाई सतत वाढू शकते. अशा परिस्थितीत वाढत्या महागाईच्या तुलनेत एफडीवर मिळणारा परतावा खूपच कमी असतो. सध्या अशीच स्थिती दिसून येत आहे. गेल्या महिन्यातली आकडेवारी पाहिली तर महागाईचा दर किंचित कमी होऊन 7.04 टक्क्यांवर आला आहे. त्या तुलनेत एफडीवर मिळणारा व्याजदर कमी आहे.

FD वर कर आकारला जातो

ज्येष्ठ नागरिकांना 50,000 रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नातून सूट देण्यात आली आहे. तुमचं व्याज उत्पन्न तुमच्या मिळकतीसह एकत्र केलं जातं आणि तुमच्या स्लॅबनुसार कर आकारला जातो. याच कारणामुळे जर तुम्ही 30 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये असाल तर एफडीतून मिळणारं 7 टक्के व्याज तुम्हाला केवळ 4.9 टक्के परतावा देऊ शकतं.

First published:

Tags: Fixed Deposit, Investment