मुंबई, 7 ऑगस्ट : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनीही व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. याचा थेट परिणाम अशा लोकांवर होईल ज्यांनी आधीच बँकेकडून कर्ज घेतले आहे किंवा ते कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणार आहेत. लोकांना आता जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट 50 बेसिस पॉइंट्सने वाढवून 8.30 टक्के केला आहे. नवे दर आज 7 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. रेपो लिंक्ड लेंडिंग रेट वाढल्याने, कॅनरा बँकेकडून होम लोन, कार लोन, पर्सनल लोन अशा सर्व प्रकारची कर्जे घेणे पूर्वीपेक्षा महाग झाले आहे. याशिवाय ज्या ग्राहकांनी आधीच कर्ज घेतले आहे, त्या ग्राहकांना आता जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. Online Shoppingवर होईल मोठी बचत, ‘या’ खास क्रेडिट कार्ड्सवर उपलब्ध आहेत विविध ऑफर्स आरबीआयने रेपो दरात वाढ केली? कॅनरा बँकेची ही घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) वाढवलेल्या रेपो दरानंतर आली आहे. आरबीआयने शुक्रवारी रेपो रेट 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्क्यांवर नेला. रेपो दराचा हा 3 वर्षांतील सर्वोच्च स्तर आहे. यामुळे कर्जाचा मासिक हप्ता वाढेल. चलनविषयक धोरण समितीने (MPC) मवाळ धोरण मागे घेण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला ग्राहकांना फायदा होईल कॅनरा बँकेच्या वेबसाइटवर अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, सामान्य ग्राहकांसाठी गृहकर्जावरील व्याजदर 8.10 टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल. मात्र महिला ग्राहकांसाठी ते 8.05 टक्के केले जाईल. कॅनरा बँक महिला कर्जदारांना 0.05 टक्के सूट देते. बँक बुडाली तर तुमचे किती पैसे परत मिळतात? बदललेला नियम समजून घ्या या बँकांनी व्याजदर वाढवले आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर आयसीआयसीआय बँक आणि पीएनबीनेही त्यांचे व्याजदर वाढवले आहेत. ICICI बँक एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (I-EBLR) रिझर्व्ह बँकेच्या वाढीव रेपो दरानुसार समायोजित करण्यात आला आहे. I-EBLR वार्षिक 9.10 टक्के आहे. नवे दर 5 ऑगस्ट 2022 पासून लागू होईल. पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेणे महाग सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेनेही दर वाढीबाबत माहिती देताना सांगितले की, RBI ने रेपो रेट वाढवल्यानंतर, रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) देखील 8 ऑगस्ट 2022 पासून 7.40 टक्क्यांवरून 7.90 टक्के करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.