मराठी बातम्या /बातम्या /मनी /

मोठी बातमी! तुमच्या खात्यात 5 नोव्हेंबरपर्यंत येणार व्याजावरील व्याजाच्या सवलतीची रक्कम, RBIचे बँकांना आदेश

मोठी बातमी! तुमच्या खात्यात 5 नोव्हेंबरपर्यंत येणार व्याजावरील व्याजाच्या सवलतीची रक्कम, RBIचे बँकांना आदेश

अर्थ मंत्रालयाच्या  (Finance Ministry) आर्थिक सेवा विभागाच्या मते, कर्जदाता कर्जावरील Loan Moratorium च्या सहा महिन्यांच्या कालावधीत चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज (compound interest and simple interest) यांच्यातील फरकाइतकी रक्कम तुमच्या खात्यात क्रेडिट करणार आहे. 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 हा लोन मोरेटोरियमचा कालावधी आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 27 ऑक्टोबर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सर्व सरकारी-खाजगी बँकां आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना असे आदेश दिले आहेत की, केंद्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे व्याजावरील व्याज माफ करण्याची योजना 5 नोव्हेंबरपर्यंत लागू केली जावी. केंद्र सरकारने कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) कर्ज फेडण्यासाठीच्या लोन मोरेटोरियम कालावधीत व्याजावर सूट देण्यासाठी मंजूरी दिली होती. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक सेवा विभागाच्या मते, 2 कोटी पर्यंतचे कर्जदारांना व्याजावरील व्याजमाफीची सवलत मिळणार आहे. कंपाउंड आणि सिंपल इंटरेस्ट यामधील फरकाची रक्कम येणार खात्यात आर्थिक सेवा विभागाच्या मते, याअंतर्गत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर सहा महिन्यांसाठी दिल्या गेलेल्या सवलतीच्या कालावधीत चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज (Compound Interest and Simple Interest) यांच्यातील फरकाइतकी रक्कम सरकार देणार आहे. ही रक्कम तुमच्या खात्यात क्रेडिट केली जाईल. ही रक्कम 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 या लोन मोरेटोरियम कालावधीसाठी असेल. आरबीआयने सर्व बँकांना 5 नोव्हेंबरपर्यंत ही रक्कम क्रेडिट करण्यास सांगितले आहे. कोणत्या कर्जावर मिळेल केंद्राच्या या योजनेचा फायदा केंद्र सरकारची ही योजना कर्ज देणाऱ्या सर्व संस्थांना लागू होईल. यामध्ये सर्व सरकारी आणि खाजगी बँका, गैर-बँकिंग वित्तीय संस्था (NBFCs), हाऊसिंग फायनान्स कंपन्या, सहकारी बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका, अखिल भारतीय आर्थिक संस्था आणि नॅशनल हाऊसिंग बँक समाविष्ट आहेत. ही योजना आठ प्रकारच्या कर्जावर लागू होईल. यामध्ये एमएसएमई कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, कंझ्यूमर ड्यूरेबल्स लोन, क्रेडिट कार्ड पेमेंट, ऑटोमोबाइल लोन, वैयक्तिक कर्ज आणि कंझम्प्शन लोन समाविष्ट आहे. (हे वाचा-Gold Price: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, तरीही दर 50 हजारांपेक्षा जास्त) 29 फेब्रुवारीपर्यंत ज्यांचे एकूण कर्ज 2 कोटीपर्यंत आहे, ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. आर्थिक संस्था संबंधित कर्जदाराच्या खात्यात पैसे पाठवून त्या पैशांकरता केंद्र सरकारकडे दावा करतील. सूत्रांच्या माहितीनुसार या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासकीय तिजोरीवर 6500 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. (हे वाचा-सामान्यांना मोफत मिळू शकतं धान्य आणि रोखरक्कम, तिसऱ्या पॅकेजच्या तयारीत सरकार) आर्थिक सेवा विभागाने (Department of Financial Services) जारी केलेल्या गाइडलाइन्सनुसार कर्जदार संबंधित कर्ज खात्यावर या योजनेचा लाभ घेऊ शकता. हा लाभ 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीसाठी आहे. अर्थ मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, योजनेचा फायदा घेण्यासाठी 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत तुमचे लोन अकाऊंट स्टँडर्ड असले पाहिजे. हे नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स (NPA) श्रेणीमध्ये आले नाही पाहिजे.
First published:

Tags: Coronavirus, Money, Narendra modi

पुढील बातम्या