नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : भारतीय रुपयाचे मुल्य वधारल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती (Gold Price Today) कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचे दर 137 रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीचे दर वधारले आहेत. चांदीच्या दरात प्रति किलो 475 रुपयांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते परदेशी शेअर बाजारात घसरण आणि डॉलरचे मुल्य कमी झाल्यामुळे सोन्यामध्ये तेजी येऊ शकते. सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 59 रुपयानी कमी होऊन 51,034 रुपये प्रति तोळा झाले होते. चांदीमध्ये देखील 753 रुपयांची घसरण होऊन दर 62,008 रूपये प्रति किलोवर पोहोचले होते
सोन्याचे नवे दर (Gold Price, 27 October 2020)
दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचे दर 137 रुपयांनी कमी होऊन 99.9 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 51,108 रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधीच्या सत्रात सोन्याच्या दराचे ट्रे़डिंग 51,245 रुपयांवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1903.6 डॉलर प्रति औंस आहेत. डॉलर इंडेक्समध्ये 0.1 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.
चांदीचे नवे दर (Silver Price, 27 October 2020)
मंगळवारी चांदीच्या दरात प्रति किलो 475 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. यानंतर चांदीचे दर 62,173 रुपये प्रति किलोग्रॅमवरून वाढून 62,648 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचे दर 0.5 टक्केने कमी होऊन 24.45 डॉलर प्रति औंस आहेत.
आज का कमी झाले सोन्याचे दर
एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर एनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते रुपयाचे मुल्य वधारले आहे, तसंत शेअर बाजारात देखील खरेदी वाढल्यामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे.
भारतात सोन्याची तस्करी वाढली
सोन्याची तस्करी करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जात आहे. सोन्याची छोटी बिस्किटं गिळण्यापासून ते अन्य रसायनांबरोबर सोन्याचा लेप शरिरावर लावण्यापर्यंत विविध प्रकारे ही तस्करी केली जाते आहे. हिंदूच्या एका अहवालानुसार मध्य पूर्व आणि भारतामध्ये सोन्याची तस्करी अधिक प्रमाणात वाढली आहे. कारण मध्य पूर्व भागात सोन्याच्या किंमती भारतीय किंमतीपेक्षा साधारण चार हजार रुपये प्रति तोळाने कमी आहेत. कॅरियरला ठराविक रक्कम दिल्यानंतरही तस्कराकडे बरिच रक्कम शिल्लक राहत असल्याने ही तस्करी वाढली आहे.