सेव्हिंग्स अकाउंटवर हाय इंटरेस्ट देणाऱ्या बँकांची ही लिस्ट बँक बाजारने तयार केली आहे. फायनेंशियल एक्सपर्ट्स नेहमीच सांगतात की, सेव्हिंग्स बँक अकाउंटमध्ये नेहमीच काही पैसे ठेवायला हवेत. हे पैसे कठीण काळात कामी येतात.
DCB बँक सेव्हिंग अकाउंटवर 8 टक्के व्याज देते. ही सर्वाधिक व्याज देणारी खासगी बँक आहे. या बँकेसाठी मिनिमम अकाउंट बॅलेन्स 2500 ते 5000 रुपये आहे.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक सेव्हिंग अकाउंटवर 7.5 टक्के व्याज देते. सेव्हिंग अकाउंटवर सर्वाधिक व्याज देणारी ही स्मॉल फायनेंस बँक आहे.
फेडरल बँक जास्त व्याज देणारी तिसरी बँक आहे. ही बँक सेव्हिंग अकाउंटवर 7.15 टक्के व्याज देते. या बँकेत महिन्याचे सरासरी बॅलेन्स किमान 5000 असावे.
DBS बँक सेव्हिंग अकाउंटवर 7 टक्के व्याज देते. ही सर्वाधिक व्याज देणारी फॉरेन बँक आहे. या बँकेत एव्हरेज क्वार्टर बॅलेन्स 10 हजार ते 25 हजार रुपये असावे.
AU Small Finance Bank, Equitas Small Finance Bank आणि Suryoday Small Finance Bank देखील सेव्हिंग अकाउंटवर 7 टक्क्यांपर्यंत व्याज देतात. त्याचप्रमाणे आयडीएफसी फर्स्ट बँक, आरबीएल बँक देखील सेव्हिंग अकाउंटवर 7 टक्के व्याज देतात.
छोट्या प्रायव्हेट बँका आणि स्मॉल फायनेंस बँक लीडिंग प्रायव्हेट आणि सरकारी बँकांच्या तुलनेत जास्त इंटरेस्ट ऑफर करते. जेणेकरून नवीन ग्राहक या बँकांमध्ये सामील होतील. तुमची बँक निवडण्यापूर्वी, तुम्हाला तिचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे, सेवा कशी आहे, तिचे ब्रांच नेटवर्क आणि एटीएम सेवा कशी आहे हे पाहावे लागेल.