मराठी बातम्या /बातम्या /मनी /

या खात्यामध्ये पैसे नसतील तरी काढू शकाल 5000 रुपये, आणखी 1.30 लाखाचा आहे फायदा

या खात्यामध्ये पैसे नसतील तरी काढू शकाल 5000 रुपये, आणखी 1.30 लाखाचा आहे फायदा

पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत खातेधारक तेव्हा देखील पैसे काढू शकतो, जेव्हा त्याच्या खात्यामध्ये अजिबात शिल्लक नसते.

पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत खातेधारक तेव्हा देखील पैसे काढू शकतो, जेव्हा त्याच्या खात्यामध्ये अजिबात शिल्लक नसते.

पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत खातेधारक तेव्हा देखील पैसे काढू शकतो, जेव्हा त्याच्या खात्यामध्ये अजिबात शिल्लक नसते.

    नवी दिल्ली, 22 जून : पंतप्रधान जन धन खाते (PMJDY) ही मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. आर्थिक समावेशनाव्यतिरिक्त या योजनेचे आणखी काही फायदे आहेत. काही खातेधारकांना या खात्यामध्ये ओव्हरड्राफ्ट सुविधा (Overdraft Facility on PMJDY)  मिळते हे अद्याप माहित नाही आहे. यासाठी अट एवढीच आहे की तुमचे खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. आधार आणि बँक खाते लिंक नसल्यास तुम्हाला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीचा फायदा घेता येणार नाही, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत खातेधारक तेव्हा देखील पैसे काढू शकतो, जेव्हा त्याच्या खात्यामध्ये अजिबात शिल्लक नसते. ही अट पूर्ण केल्यास मिळते ओव्हरड्राफ्ट सुविधा तज्ज्ञांच्या मते, या योजनेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकांना पहिले सहा महिने त्यांचे खाते व्यवस्थित ठेवावे लागेल. त्यांच्या खात्यामध्ये या काळात आवश्यक रक्कम असणे गरजेचे आहे. त्यामध्ये व्यवहार देखील होणे आवश्यक आहे. (हे वाचा-मोदी सरकार 1000 रुपये भाड्याने देणार घर, वाचा कुणाला होणार फायदा) या खातेधारकांना रुपे (Rupay) डेबिट कार्ड दिले जाते. त्याचा वापर करून अनेक व्यवहार सहज करता येतात. संबंधित बँकेला तुमचे खाते व्यवस्थित वाटले तर खातेधारकाला 5000 पर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते. काही प्रकरणात ही सुविधा आंशिक व्याज चुकते केल्यानंतर मिळते. अ‍ॅक्सीडेंटल इ्न्शूरन्सची देखील सुविधा उपलब्ध तुमचे पीएम जन धन खाते आधार कार्डशी लिंक आहे, तर या योजनेचा फायदा देखील तुम्हाला घेता येईल. या खातेधारकांना मिळणाऱ्या रुपे डेबिट कार्डवर ग्राहकांना  लाक रुपयांपर्यंतचा अ‍ॅक्सीडेंटल इ्न्शूरन्स (Accidental Insurance on RuPay Debit Card) देखील मिळतो. त्याचप्रमाणे खात्यामध्ये कमीत कमी रक्कम ठेवण्याची देखील चिंता नाही आहे. (हे वाचा-खरं की खोटं: महिलांना मिळणार शून्य टक्के व्याजदरावर 5 लाखांचे कर्ज?) मात्र तुमचे खाते आधारशी लिंक नसेल तर नॉमिनीला देखील अपघाती इन्शूरन्सचा लाभ घेता येणार नाही. या योजनेव्यतिरिक्त रुपे डेबिट कार्डावर खातेधारकाचा कोणत्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्यास 30,000 रुपयांचा इन्शूरन्स कव्हर देखील मिळतो. म्हणजेच कोणत्याही दुर्घटनेमध्ये खातेधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला एकूण 1.30 लाखाचा लाभ मिळू शकतो. कुठे आणि कसे उघडला जन धन खाते (How to open Jan Dhan Bank Account) देशातील प्रत्येक नागरिक बँकिंगशी जोडला जावा याकरता जन धन सेवा सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही बँकेच्या शाखेमध्ये जाऊन तुम्ही जन धन खाते सुरू करू शकता. बँक मित्राच्या साहाय्याने देखील हे खाते काढता येईल. या खात्यामध्ये कमीतकमी शिल्लक ठेवण्याची अट नाही आहे. हे खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्राव्यतिरिक्त केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. तुमचा फोटो देखील देणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र तुम्हाला तुमच्या सेल्फ अॅटेस्टेड फोटोसह बँक अधिकाऱ्याच्या समोर स्वाक्षरी करून खात्यासाठी अर्ज करता येईल. संपादन - जान्हवी भाटकर
    First published:

    Tags: Jan dhan, Money

    पुढील बातम्या