नवी दिल्ली, 9 मे : कोरोना काळात मोदी सरकारने नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. इंप्लॉइज डिपॉजिट लिंक्ड इन्शोरन्स स्किम, 1976 (EDLI Scheme) अंतर्गत देण्यात येणाऱ्या विमा रकमेची मर्यादा आता 6 लाख रुपयांवरुन 7 लाख रुपये करण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) आपल्या सदस्यांना जीवन विमा सुविधा देते. EPFO चे सर्व सब्सक्रायबर्स इंप्लॉइज डिपॉजिट लिंक्ड इन्शोरन्स स्किम 1976 अंतर्गत कव्हर होतात. आता इन्शोरन्स कव्हरची रक्कम जास्तीत जास्त 7 लाख रुपये करण्यात आली आहे. आधी ही रक्कम 6 लाख रुपये इतकी होती. नुकतंच कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षेतेखाली ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने 9 सप्टेंबर 2020 रोजी EDLI योजनेअंतर्गत अधिकतर विमा रक्कम वाढवून 7 लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 28 एप्रिल रोजी EDLI योजनेअंतर्गत विमा रक्कम 7 लाख रुपये करण्याचा निर्णय लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली. अधिसूचनेच्या तारखेपासून वाढवलेली रक्कम लागू झाली आहे. EDLI योजनेअंतर्गत आजार, अपघात किंवा मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याच्या नॉमिनीच्या वतीने क्लेम केला जाऊ शकतो. या योजनेत कोणीही नॉमिनी नसल्यास ही रक्कम मृत कर्मचाऱ्याचा जोडीदार, अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी यांना मिळते.
(वाचा - तुमच्याकडे 1 रुपयाची नोट आहे? घरबसल्या 45 हजार कमवण्याची संधी, करा फक्त एक काम )
क्लेम अमाउंट कॅल्क्युलेशन कसं कराल? EDLI योजनेत क्लेमची गणना कर्मचाऱ्याला मिळालेल्या शेवटच्या 12 महिन्यांच्या बेसिक सॅलरी+DA च्या आधारे केली जाते. आता दुरुस्तीअंतर्गत विमा कव्हर बेसिक पगार+DA च्या 35 पट असेल, जो आधी 30 पट होता. त्याशिवाय आता 1.75 लाख रुपये अधिकतर बोनस मिळेल, जो आधी 1.50 लाख रुपये होता. हा बोनस शेवटच्या 12 महिन्यांच्या अॅव्हरेज पीएफ बॅलेन्सच्या 50 टक्के असतो.
(वाचा - Netflixयुजर्ससाठी खास N-Plus सब्सक्रिप्शन;असा पाहता येणार Behind the Sceneकंटेंट )
उदा. शेवटच्या 12 महिन्यांची बेसिक सॅलरी+DA जर 15000 रुपये असेल, तर इन्शोरन्स क्लेम (35 x 15,000) + 1,75,000= 7 लाख रुपये होईल.