मुंबई, 2 ऑगस्ट: आनंदी आणि सुखकर आयुष्य जगण्याची इच्छा तर प्रत्येकालाच असते. त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परिने धडपडत असतो. आर्थिक गुंतवणूक करणं ही या धडपडीचाच एक भाग असतो. तुम्हीही तुमचं आयुष्य सुखकर व्हावं याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी LIC ची सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Yojana) एक चांगला पर्याय ठरू शकतो. या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाला पॉलिसी घेताना एकच प्रीमियम भरावा लागतो. म्हणजेच पॉलिसीधारकाला प्रीमियम एकदाच भरावा लागतो. यानंतर पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळते.
या सुविधेचा लाभ कसा घ्यावा-
तुम्ही ही पॉलिसी दोन प्रकारे घेऊ शकता, पहिली- सिंगल लाईफ पॉलिसी आणि दुसरी- संयुक्त लाईफ पॉलिसी.
1. सिंगल लाईफ पॉलिसी- ही पॉलिसी कोणत्याही एका व्यक्तीच्या नावावर घेता येईल. पॉलिसी धारक हयात असताना त्याला ती पेन्शनच्या स्वरूपात मिळत राहील. पेन्शन धारकाच्या मृत्यूनंतर, मूळ प्रीमियमची रक्कम त्याच्या नॉमिनीला मिळेल.
2. जॉइंट लाइफ पॉलिसी- जॉइंट लाइफ ऑप्शननुसार पती-पत्नी दोघेही या योजनेशी संबंधित असतील. या दोघांपैकी कोणालाही या पेन्शनची रक्कम मिळत राहिल. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला पेन्शनची पूर्ण रक्कम दिली जाईल.तसेच पेन्शनच्या रकमेत कोणतीही कपात केली जाणार नाही. पती-पत्नी दोघांच्या मृत्यूनंतर, जो कोणी नॉमिनी असेल, त्यांना आधारभूत किंमत दिली जाईल. सरल पेन्शन योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज कसा करता येतो.
हेही वाचा: एकच नंबर! Home Loan EMI सोबतच सुरु करा SIP, 20 वर्षांत घराची पूर्ण किंमत होईल रिकव्हर
ऑफलाइन अर्ज कसा करावा?
आवश्यक कागदपत्रे-
किती गुंतवणूक करता येते?
या योजनेअंतर्गत किमान एन्युटी 12000 रूपये प्रतिवर्ष आहे. दरवर्षी किमान 12 हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जातील. अॅन्युइटी म्हणजे विमा कंपनी ग्राहकाला गुंतवणुकीच्या बदल्यात दरवर्षी प्रदान करते अशी रक्कम. योजनेमध्ये कोणतीही कमाल गुंतवणूक मर्यादा नाही.
एलआयसी कॅल्क्युलेटरनुसार तुमचं वय ४२ वर्षे असल्यास. अशा परिस्थितीत, जर तुम्ही 30 लाख रुपयांची एन्युटी खरेदी केली तर तुम्हाला दरमहा 12,388 रुपये पेन्शन मिळेल.
40 ते 80 वर्षे वयोगटातील लोक ही योजना खरेदी करू शकतात. जर तुम्हाला मासिक पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एका महिन्यात किमान 1000 रुपये, 3 महिन्यांत 3000 आणि 6 महिन्यांत 6000 रुपये गुंतवावे लागतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LIC, Pension scheme, Policy plans