मुंबई, 17 ऑक्टोबर: अलीकडच्या काळात लोकांना गुंतवणूकीचं महत्त्व ओळखलं आहे. प्रत्येकजण आपापल्या कमाईतील थोडा भाग बाजूला ठेवून तो योग्य ठिकाणी गुंतवण्याचा विचार करत असतो. सध्या गुंतवणूकीचे अनेक पर्याय लोकांना उपलब्ध आहेत. तरीही एलआयसीमध्ये गुंतवणूक करणं लोकांना अधिक सुरक्षित वाटतं. एलआयसीनंही विविध वर्गातील आणि वयातील लोकांसाठी अनेक स्कीम आणल्या आहेत. त्यामुळंच आपल्यापैकी बहुतेक लोक ज्यांना आपल्या भविष्याबद्दल खूप काळजी वाटते, असे लोक एलआयसीच्या विविध योजनांत गुतवणूक करतात. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका अतिशय चांगल्या योजनेबद्दल सांगणार आहोत. एलआयसीच्या या योजनेचं नाव सरल पेन्शन योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा 12 हजार रुपये पेन्शन मिळवू शकता. ही योजना तुमचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी काम करेल. अशाप्रकारे वृद्धापकाळात तुम्हाला इतर कोणत्याही व्यक्तीवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहण्याची गरज नाही. आज आपण जाणून घेऊया की एलआयसी सरल पेन्शन प्लॅनमध्ये गुंतवणूक करून तुम्ही दरमहा 12 हजार रुपये पेन्शन कसे मिळवू शकता? हेही वाचा: उधारी असो किंवा काँट्री ‘ही’ सिक्रेट ट्रिक वापरून तुमचे पैसे रिटर्न मिळवू शकता एलआयसी सरल पेन्शन योजना ही सिंगल प्रीमियम योजना आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला मुदत ठेवीप्रमाणे लाभ मिळतो. या योजनेत फक्त 40 ते 80 वयोगटातील लोकच गुंतवणूक करू शकतात.तुम्ही तुमच्या पत्नीसोबतही ही योजना खरेदी करू शकता. या योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. तुम्ही वयाच्या 42 व्या वर्षी LIC सरल पेन्शन प्लॅनमध्ये 30 लाख रुपयांची अॅन्युटी खरेदी केल्यास अशा परिस्थितीत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 12,388 रुपये पेन्शन मिळेल.
या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कर्जाची सुविधाही मिळते. एलआयसी सरल पेन्शन प्लॅनमध्ये, तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर पेन्शन लाभ मिळतात. LIC सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक करताना काही कागदपत्रे आपल्याकडे असणं आवश्यक आहे. यामध्ये वास्तव्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, वयाचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक तपशील आणि पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.

)







