मुंबई : बऱ्याचदा मित्र-मैत्रीणी किंवा आपल्या ओळखीच्या लोकांना दिलेले पैसे आपल्याला परत दिले जात नाहीत. अगदी ऑफिसच्या कलीग पासून ते खास मित्रमैत्रिणींपर्यंत असे काही लोक असतात जे पैसे देण्यासाठी टाळाटाळ करतात. मग अशा लोकांना सतत मेसेज करणं किंवा त्यांच्याकडून पैसे काढून घेणं खूप अवघड होऊन जातं. आज आम्ही तुम्हाला एक सिक्रेट ट्रिक सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना दिलेले पैसे अगदी सहज परत मिळवू शकता. ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की वापरून पाहा. तुम्ही जर कलीग किंवा मित्रांसोबत पार्टी केली किंवा जेवणाचा प्लॅन केला असेल आणि तुम्ही पे करून बाहेर पडला पण आता प्रत्येकाकडे मेसेज किंवा फोन करून मागण्याऐवजी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. ही ट्रिक एवढी भारी आहे की तुम्ही तिथे किंमतही कस्टमाइज ठेवू शकता आणि एकावेळी सगळ्या मित्रांना किंवा मैत्रिणींना हा मेसेज पाठवू शकता.
मोदी सरकारकडून दिवाळीआधी गिफ्ट! हे शेतकरी राहणार वंचित काय आहे कारण?तुम्हाला सगळ्यात आधी गुगल पेवर जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला वर सर्च बारवर जाऊन टॅब करायचं आहे. तिथे तुम्हाला क्रिएट ग्रूप असा पर्याय येईल. तो पर्याय निवडायचा. त्यानंतर तुम्हाला ज्यांना कॉन्ट्रीचे पैसे मागायचे आहेत त्यांचे नंबर सिलेक्ट करायचे. त्यांचा एक ग्रूप तयार करायचा आहे.
हा ग्रूप तयार करून झाला की एकूण बिलाची भरलेली रक्कम तिथे लिहायची आहे. ती सगळ्यांमध्ये बरोबरीने भागली जाईल. तुम्ही प्रत्येक कॉन्टॅक्टमधील रक्कम ही कमी अधिक देखील करू शकता. तसा एडिटचा पर्याय देण्यात आला आहे. तिथे तुम्ही रक्कम बदलू देखील शकता.
बँकेत जाण्याचं टेंशन गेलं? देशात डिजिटल बँकिंग युनिट लाँच; कसा करायचा वापर?हे झाल्यानंतर Done पर्याय निवडा. तुम्ही जो ग्रूप तयार केला आहे त्या ग्रूपला पैसे पाठवण्याची रिक्वेस्ट सेंड होईल. तुमचे पैसे तुम्ही अशा पद्धतीने मागू शकता. गुगल पेनं लोकांची ही गरज ओळखून हे फीचर आणलं आहे. मात्र हे फीचर नक्की वापरायचं कसं हे फार क्वचित लोकांना माहिती आहे. आता ही सिक्रेट हॅक वापरून तुम्ही तुमच्या ग्रूपमध्ये उधार दिलेले पैसे किंवा कॉन्ट्रिचे पैसे बिनधास्त मागू शकता.

)







