हे अॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल प्ले स्टोअरवर डाउनलोड करावं लागेल. लस देण्यास सुरुवात केल्यानंतर, जे लोक अॅपवर आधीपासून रजिस्टर असतील त्यांना लवकरात लवकर वॅक्सिन मिळेल.
नवी दिल्ली, 4 जानेवारी : भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शनिवारपासून कोरोना वॅक्सिनचं (Corona vaccine) ड्राय रन सुरू करण्यात आलं आहे. याच दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना वॅक्सिन वितरण, डेटा ठेवण्यासाठी आणि लोकांना वॅक्सिनसाठी रजिस्टर करण्यासाठी कोविन (Co-WIN App) नावाचं एक अॅप बनवलं आहे. देशाचे नागरिक जे सेल्फ वर्कर्स नाहीत, ते वॅक्सिनसाठी CoWIN अॅपवर सेल्फ-रजिस्टर करू शकतात. हे अॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल प्ले स्टोअरवर डाउनलोड करावं लागेल. लस देण्यास सुरुवात केल्यानंतर, जे लोक अॅपवर आधीपासून रजिस्टर असतील त्यांना लवकरात लवकर वॅक्सिन मिळेल.
CoWIN अॅप -
CoWIN (COVID-19 Vaccine Intelligence Network), eVIN (Electronic Vaccine Intelligence Network) चं अपग्रेडेड वर्जन आहे. हे अॅप प्ले स्टोअरवर फ्री असणार आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, सरकार तीन टप्प्यांमध्ये लसीकरण करणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्व फ्रंटलाईन हेल्थकेयर प्रोफेशनल्स आणि दुसऱ्या टप्प्यात आपातकालीन सेवांशी जोडलेल्या लोकांना लस देण्यात येईल. राज्य सरकार या लोकांचा डेटा मिळवण्याचं काम करत आहेत. तिसऱ्या टप्प्यात गंभीर आजारांनी पीडित असलेल्या लोकांना लस देण्यात येईल. त्यासाठी CoWIN अॅपद्वारे एक सेल्फ रजिस्ट्रेशन प्रोसेसची आवश्यकता आहे.
COVID-19 वॅक्सिन ट्रॅकिंग आणि रजिस्ट्रेशन निश्चित करण्यासाठी CoWIN अॅपला 5 मॉड्यूलमध्ये विभागण्यात आलं आहे. ज्यात पहिलं प्रशासनिक मॉड्यूल, दुसरं रजिस्ट्रेशन मॉड्यूल, तिसरं वॅक्सिनेशन मॉड्यूल, चौथं लाभान्वित स्वीकृती मॉड्यूल आणि पाचवं रिपोर्ट मॉड्यूल आहे. जे लोक लसीकरण करू इच्छितात, त्यांना रजिस्ट्रेशन मॉड्यूलअंतर्गत संपूर्ण माहिती द्यावी लागेल. वॅक्सिनेशन मॉड्यूलमध्ये त्यांचा तपशील पडताळला जाईल आणि लाभान्वित स्वीकृती मॉडेल त्यांच्या लसीकरणाबाबत त्यांना एक प्रमाणपत्र पाठवेल.
CoWIN अॅप - Vaccine साठी कसं कराल रजिस्टर?
- जे नागरिक आरोग्य कर्मचारी नाही, ते CoWIN अॅपवर रजिस्ट्रेशन मॉड्यूलच्या माध्यमातून वॅक्सिनसाठी रजिस्टर करू शकतील. CoWIN अॅप अद्याप लाँच झालेलं नाही.
Co-WIN platform to facilitate:
🔹Registration & verification of beneficiaries
🔸Scheduling inoculation
🔹SMS reminders for schedule & follow on dosage
🔸Reporting Adverse Event Following Immunisation
🔹e-Certificate post-vaccination pic.twitter.com/TP4ZHi8KPD
- CoWIN वेबसाईटवर सेल्फ रजिस्ट्रेशनसाठी 12 फोटो आयडेंटिटी डॉक्यूमेंट्स Voter ID, Aadhar card, driving license, passport आणि Pension document पैकी कोणत्याही एकाची गरज असेल.
- ऑनलाईन रजिस्ट्रेशननंतर, रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक SMS येईल, ज्यात मिळालेली तारीख, वॅक्सिनेशनची वेळ आणि ठिकाण दिलं जाईल.
Published by:Karishma
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.