नवी दिल्ली, 02 जून: सरकारी बँक असणाऱ्या बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda BoB) च्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. तुमची सरकारी बँकेमध्ये (PSU Banks) पैसे गुंतवून कमाई करण्याची इच्छा असेल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या शेअर्समध्ये (Investment in Shares) पैसे गुंतवू शकता. या बँकेतील शेअर्समध्ये केलेल्या गुंतवणुकीनंतर तुम्हाल 6 महिने ते एका वर्षाच्या कालावधीमध्ये 60 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो. एका रिसर्च रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. सरकारी बँक असल्यामुळे याठिकाणी इतर कंपन्यांच्या तुलनेत जोखीमही कमी आहे. त्यामुळे अधिकाधिक गुंतवणुकदारांना याठिकाणी गुंतवणूक करणं सुरक्षित वाटतं. शेअरमध्ये येईल 60 टक्क्यांची तेजी विदेशी ब्रोकरेज फर्म CLSA च्या मते, बँक ऑफ बडोदाच्या शेअरमध्ये पुढील सहा महिने ते एका वर्षात 60 टक्के उसळी होईल, असा अंदाज त्यांनी त्यांच्या अहवालात व्यक्त केला आहे. बँकेच्या कॉर्पोरेट क्रेडिट सायकलमध्ये बदल होत आहेत आणि पर्याप्त रक्कम गोळा करण्यासाठी बँकेकडे तेवढी रक्कम आहे. शिवाय कोरोना काळात बँकेची रिटेल अॅसेट क्लालिटी देखील मजबुत झाली आहे. हे वाचा- याठिकाणी केवळ 1 रुपया 46 पैशांत मिळतंय एक लीटर पेट्रोल, वाचा काय आहे कारण बँकेची कमाई वाढण्याचा अंदाज CLSA या विदेशी ब्रोकरेज फर्मच्या मते बँक ऑफ बडोदामध्ये सद्यस्थितीत व्हॅल्यूएशन 0.55 टक्के आहे. आर्थिक वर्ष 2023 ची बुक व्हॅल्यू अनडिमांडिंग आहे. या विदेशी ब्रोकरेज फर्मने बँकेच्या कमाईचा अंदाज 4-5 टक्के वाढेल असं म्हटलं आहे. तसंच टारगेट प्राइस देखील 125 रुपयांवरुन 130 रुपये केली आहे. बँक ऑफ बडोदाचा शेअर (Investment in Share Market) मंगळवारी 81.20 रुपयांच्या आसपास ट्रेड करत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.