मुंबई, 6 नोव्हेंबर: जर तुम्ही बँकेतून कोणत्याही प्रकारचं कर्ज घेतलं असेल आणि ते तुम्ही फेडण्यास सक्षम नसाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कारण आता कर्जाची परतफेड न केल्यास बँक तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. कारण ग्राहक म्हणून तुमचेही काही अधिकार आहेत. ज्याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. जर तुम्हाला तुमचे अधिकार माहित नसतील तर तुम्ही येथे बँकेशी संबंधित सर्व अधिकारांची माहिती देत आहोत. त्यानंतर कोणताही बँक कर्मचारी तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अनेकदा लोक कार खरेदी, मुलांसाठी शैक्षणिक कर्ज आणि लग्न, व्यवसाय कर्ज आणि गृह कर्ज यासारख्या मोठ्या गरजांसाठी बँकेकडून कर्ज घेतात. आजकाल बँका देखील ग्राहकांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर देत असतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कर्ज ही एक मोठी आर्थिक जबाबदारी आहे. तुम्हाला दर महिन्याला कर्जाचा ईएमआय वेळेवर भरावा लागेल. जर एखाद्या ग्राहकाने कर्ज घेतल्यानंतर निश्चित तारखेपर्यंत कर्जाचा हप्ता परत केला नाही, तर अशा परिस्थितीत बँका ग्राहकांना कॉल आणि संदेश पाठवण्यास सुरुवात करतात. बँकांच्या वसुली एजंटकडून ग्राहकांनी पैसे न भरल्यास त्यांना धमकावले जात असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. जर तुमच्यासोबतही असं काही होत असेल तर आरबीआयनं याबाबत काही नियम केले आहेत. कर्जाचे पैसे न भरल्यास बँकेने ग्राहकांना धमकावले, तर ग्राहक पोलिसांकडे तक्रार करू शकतो आणि स्वत:साठी पेनल्टीदेखील मागू शकतो. हेही वाचा: हे बाकी झ्याक झालं! आता पोस्ट ऑफिस ग्राहकांना मिळणार ‘ही’ खास सुविधा, करावं लागेल सोपं काम अशा परिस्थितीत तुम्ही तक्रार करू शकता- कर्जाच्या स्वरूपात दिलेली रक्कम वसूल करण्याचा बँकांना अधिकार आहे, परंतु यासाठी त्यांना आरबीआयने बनवलेल्या काही नियमांचे पालन करावे लागेल. बँक अधिकारी किंवा रिकव्हरी एजंट डिफॉल्टरला सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत कॉल करू शकतात. यासोबतच त्यांच्या घरी जाण्याची वेळही सकाळी 7 ते सायंकाळी 7 ही आहे. बँकेचा प्रतिनिधी या वेळेशिवाय तुमच्या घरी आला तर तुम्ही फोन करून तक्रार नोंदवू शकता.
कोणालाही गैरवर्तन करण्याचा अधिकार नाही- जर एखाद्या ग्राहकाने पुढील 90 दिवसांत हप्त्याचे पैसे जमा केले नाहीत, तर बँक ग्राहकाला नोटीस बजावते. त्यानंतर पैसे जमा करण्यासाठी पुन्हा 60 दिवसांचा अवधी दिला जातो. यानंतरही जर एखाद्या व्यक्तीने पैसे जमा केले नाहीत, तर बँक त्याची गहाण मालमत्ता म्हणजेच घर, कार विकून त्याचे पैसे वसूल करू शकते. जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि तुम्ही ते फेडण्यास असमर्थ असाल तर बँक त्याच्या वसुलीसाठी तुमच्याशी संपर्क साधू शकते, परंतु कोणत्याही बँक अधिकाऱ्याला किंवा वसुली एजंटला कोणत्याही ग्राहकाशी गैरवर्तन करण्याचा अधिकार नाही. जर कोणी तुमचा मानसिक किंवा शारीरिक छळ करत असेल तर तुम्ही बँकेकडे तक्रार करू शकता.