• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • काढणी चालू असताना शेतकऱ्यांना चिंता; दर घसरणीमुळं सोयाबीनची आवकही घटली

काढणी चालू असताना शेतकऱ्यांना चिंता; दर घसरणीमुळं सोयाबीनची आवकही घटली

राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील सोयाबीनचे दर (Soybean rate) कमी झाले आहेत. दर कमी मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात आणणे थांबवले असून त्यामुळे आवक कमी झाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 14 ऑक्टोबर : सप्टेंबर महिन्यात क्विंटलला 10 हजारांपर्यंत गेलेला सोयाबीनचा भाव सध्या 4000 ते 5400 पर्यंत खाली आला आहे. यामुळं सोयाबीनची काढणी सुरू असतानाच शेतकऱ्यांसमोर चिंतेचे वातावरण आहे. तर या सोयाबीन (Soyabean Rate) दराचा परिणाम आता थेट बाजारपेठेवर होत आहे. दर कमी झाल्यानं बाजार समित्यांमध्ये काल आणि आजही सोयाबीनची आवक (Soybean falling rates in Maharashtra) घटल्याचे दिसून आलं. मंगळवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला केवळ 5100 रुपये दर मिळाला. त्यामुळे सोयाबीन बाजार समितीमध्ये आणण्यास शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून आलं. विदर्भ, मराठवाड्यात सोयाबीन हे खरीपातील मुख्य पीक असलं तरी यंदा या पीकातून शेतकऱ्यांचे अधिकचे नुकसानच झालेले आहे. पीक जोमात असाताना पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता तर आता काढणीला पीक असताना अतिवृष्टी झाली होती. हे वाचा - घाऊक बाजारात कांद्याचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांना दिलासा; पावसानं झालेलं नुकसान भरून निघण्याची अपेक्षा बाजारपेठेत सोयाबीनचे दर कोसळत आहेत. तेलबियांचे दर हे कमी होत आहेत तर खाद्यतेलाचे दर हे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप आता अनेक शेतकरी करीत आहेत. त्यामुळे सोयाबीनची आवक बाजारातील आवकही घटल्याचे चित्र आहे. राज्यातील बाजार समित्यांमधील ताजे बाजारभाव असे -
  दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
  14/10/2021 अहमदनगर --- क्विंटल 69 4450 5000 4725
  14/10/2021 अहमदनगर लोकल क्विंटल 730 3601 5300 5065
  14/10/2021 अकोला पिवळा क्विंटल 3212 3950 5251 4588
  14/10/2021 अमरावती --- क्विंटल 950 4500 4650 4575
  14/10/2021 बीड --- क्विंटल 3001 4526 5068 4875
  14/10/2021 बीड पिवळा क्विंटल 101 3700 4700 4200
  14/10/2021 बुलढाणा पिवळा क्विंटल 644 4000 5000 4500
  14/10/2021 चंद्रपुर पिवळा क्विंटल 114 3000 4685 3938
  14/10/2021 जळगाव --- क्विंटल 21 4150 4200 4150
  14/10/2021 जळगाव लोकल क्विंटल 55 4551 4790 4790
  14/10/2021 जळगाव पिवळा क्विंटल 120 4490 4918 4818
  14/10/2021 जालना पिवळा क्विंटल 13486 3675 5125 4888
  14/10/2021 लातूर --- क्विंटल 2250 5100 5365 5232
  14/10/2021 लातूर पिवळा क्विंटल 7303 4500 5263 5070
  14/10/2021 नागपूर पिवळा क्विंटल 203 2011 4501 3390
  14/10/2021 नांदेड --- क्विंटल 111 4300 5000 4700
  14/10/2021 नांदेड पिवळा क्विंटल 584 4263 5053 4676
  14/10/2021 नंदुरबार --- क्विंटल 20 4515 4920 4515
  14/10/2021 नाशिक --- क्विंटल 1630 3000 5256 4800
  14/10/2021 नाशिक पांढरा क्विंटल 345 3599 5186 4700
  14/10/2021 परभणी --- क्विंटल 19 5000 5000 5000
  14/10/2021 परभणी पिवळा क्विंटल 358 4513 5235 5025
  14/10/2021 सोलापूर लोकल क्विंटल 665 4250 5190 5015
  14/10/2021 वाशिम --- क्विंटल 7000 3925 5125 4650
  14/10/2021 वाशिम पिवळा क्विंटल 1885 4000 5200 4900
  14/10/2021 यवतमाळ पिवळा क्विंटल 3173 4200 4961 4688
  राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 48049
  (माहिती सौजन्य - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
  Published by:News18 Desk
  First published: