LIC Policy: भारतात अनेक लोकांना एलआयसीवर विश्वास आहे. एलआयसीला सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. दरम्यान आज आपण LIC च्या अशा एका प्लानविषयी जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला 1 कोटींपेक्षा जास्त फायदा मिळू शकतो. LIC सर्व लोकांना लक्षात घेऊन पॉलिसी तयार करत असते. यामधील एक बेस्ट पॉलिसी म्हणजे जीवन शिरोमणी पॉलिसी आहे. ही पॉलिसी प्रोटेक्शनसोबतच सेव्हिंगची ऑफरही देते. हा एलआयसीचा नॉन लिंक्सड प्लान आहे. यामध्ये किमान 1 कोटी रुपयांची हमी दिली जाते. विमा रक्कम ही ग्राहकाला विमा कंपनीकडून निश्चितपणे मिळणारी रक्कम आहे.
उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी ही पॉलिसी डिझाइन करण्यात आली आहे. जर एखाद्या पॉलिसीधारकाचा मुदतपूर्तीपूर्वी मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. ही मर्यादित प्रीमियममध्ये मनी बॅक प्लान देखील आहे. ज्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी पैसे मिळतात. पॉलिसीमध्ये गुंतवणुकीचे कमाल वय 55 वर्षे (पॉलिसी टर्म 14 वर्षे), 51 वर्षे (पॉलिसी टर्म 16 वर्षे), 48 वर्षे (पॉलिसी टर्म 18 वर्षे) आणि 45 वर्षे (पॉलिसी टर्म 20 वर्षे) आहे.
तुम्हाला गुंतवणूक किती करावी लागेल?
जीवन शिरोमणी पॉलिसीमध्ये बेसिक सम एश्योर्ड एक कोटी रुपये आहे. यासाठी ग्राहकाला चार वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर रिटर्न मिळणं सुरू होईल. गुंतवणुकीच्या रकमेबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकाला दरमहा सुमारे 94,000 रुपये जमा करावे लागतील. या पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारक जिवंत राहिल्यास ठराविक कालावधीत पेमेंट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कमही दिली जाते. या योजनेत गंभीर आजारांसाठी संरक्षण देखील दिले जाते आणि त्यात 3 पर्यायी रायडर्स उपलब्ध आहेत.
FD बेस्ट की डेट म्यूच्युअल फंड? कशात जास्त सुरक्षित असतो पैसा? जाणून घ्या एक्सपर्ट काय सांगतातसरव्हाइवल बेनिफिट काय?
सर्व्हायव्हल बेनिफिट म्हणजे पॉलिसी धारकांच्या हयातीवर निश्चित पेमेंट केले जाते, जे खालीलप्रमाणे आहे:- - 14 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 10व्या आणि 12व्या वर्षांमध्ये विमा रकमेच्या 30% - 16 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 12व्या आणि 14व्या वर्षात विमा रकमेच्या 35% - 18 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 14व्या आणि 16व्या वर्षांत विम्याच्या रकमेच्या 40% - 20 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 16व्या आणि 18व्या वर्षात विमा रकमेच्या 45%
किती कर्ज मिळेल
पॉलिसीच्या मुदतीदरम्यान, ग्राहक एलआयसीच्या अटी व शर्तींच्या आधारावर पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूवर कर्ज घेऊ शकतो. पॉलिसी लोन वेळोवेळी ठरलेल्या व्याजदरावर उपलब्ध असेल.