मुंबई, 25 जुलै: देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आपल्या ग्राहकांना गुंतवणुकीसाठी अनेक उत्तम पॉलिसी प्रदान करते. LIC कडे सर्व वयोगटातील लोकांसाठी पॉलिसी उपलब्ध आहेत आणि वेळोवेळी नवीन पॉलिसी देखील लाँच करते. एलआयसीच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून मोठी रक्कम गुंतवू शकता. अशीच एक योजना म्हणजे जीवन शिरोमणी योजना (LIC Jeevan Shiromani Plan). या योजनेची सुरुवात एलआयसीने 2017 मध्ये केली होती. यामध्ये तुम्ही चार वर्षांसाठी गुंतवणूक करून एक कोटी रुपयांचा निधी जमा करू शकता. बचतीसह सुरक्षा- LIC ची जीवन शिरोमणी योजना ही नॉन-लिंक्ड योजना आहे. ही मर्यादित प्रीमियम असणारी मनी बॅक विमा योजना आहे. यामध्ये पॉलिसी घेणाऱ्याला 1 कोटी रुपयांच्या विमा रकमेची हमी दिली जाते. या योजनेत तुम्हाला बचतीसोबत सुरक्षाही मिळेल. हा प्लान विशेषतः जास्त संपत्ती असलेल्या लोकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. ही योजना किमान एक कोटी रुपयांच्या मूळ विमा रकमेसह घ्यावी लागेल. पॉलिसी घेण्याचे निश्चित वय- जीवन शिरोमणी पॉलिसीसह लॉयल्टीच्या रूपात नफा देखील जोडला जातो. 1 कोटी रुपयांची विमा रक्कम घेणाऱ्या व्यक्तीला फक्त चार वर्षे गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर रिटर्न येऊ लागतात. पॉलिसीधारकांना त्याचे फायदे मिळवण्यासाठी दरमहा प्रीमियम म्हणून मोठी रक्कम जमा करावी लागते. पॉलिसीधारक वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक आधारावर प्रीमियम भरू शकतात. ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी किमान वय 18 वर्षे असावे. जीवन शिरोमणी योजनेत 14, 16, 18 आणि 20 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. हेही वाचा: शेवटची संधी अन्यथा PM Kisan योजनेचा पुढचा हप्ता येणार नाही; घरबसल्या करा eKYC किती प्रीमियम भरावा लागेल- एलआयसी कॅल्क्युलेटरनुसार, जर 29 वर्षीय व्यक्तीने 20 वर्षांसाठी ही पॉलिसी घेतली, तर त्याला पहिल्या वर्षासाठी दरमहा करासह 61,438 रुपये प्रीमियम भरावा लागेल. त्याच वेळी, दुसऱ्या वर्षापासून, व्यक्तीला प्रत्येक महिन्याला 60,114.82 रुपये प्रीमियम जमा करावा लागेल. मॅच्युरिटीवर तुम्हाला 1,34,50,000 रुपये मिळतील. हे मिळतात फायदे- पॉलिसीधारकांना या योजनेत सर्व्हायव्हल बेनिफिट देखील मिळतो. याशिवाय, पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, विशिष्ट रक्कम विमाधारकाच्या नॉमिनीला तो मिळतो. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, ठराविक मर्यादेनंतर नॉमिनीला रक्कम दिली जाते. पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर, नॉमिनीला एकरकमी रक्कम देखील दिली जाते. कर्जही घेऊ शकता- या प्लॅनमध्ये कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. किमान एक वर्ष प्रीमियम भरल्यानंतर तुम्ही कर्ज घेऊ शकता. प्लॅनमध्ये जोडलेल्या अटींनुसार तुम्ही कर्ज घेऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.