मुंबई, 10 ऑगस्ट: : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. शहर असो वा गाव, लोकांचा अजूनही विम्यासाठी एलआयसीवर विश्वास आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे यामध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो तसेच पैशाची सुरक्षितता. कंपनी विविध लक्ष्ये लक्षात घेऊन अनेक विमा पॉलिसी ऑफर करत आहे. यापैकी एक म्हणजे एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी (LIC Jeevan Lakshya Plan Detail) होय. ही अशी पॉलिसी आहे, जी विमाधारकाच्या मृत्यूनंतरही पॉलिसीचे ध्येय पूर्ण करते. विमाधारकाच्या मृत्यूनंतर, विमा हप्ता कंपनीकडून भरला जातो. त्याच वेळी, दरवर्षी नॉमिनीला खर्चासाठी विमा रकमेच्या 10 टक्के रक्कम मिळते. पॉलिसीसाठी पात्रता आणि वैशिष्ट्ये- 18 ते 55 वर्षे वयोगटातील लोक एलआयसी जीवन लक्ष्य योजनेत गुंतवणूक करू शकतात. पॉलिसीची मुदत 13 ते 25 वर्षे आहे. मॅच्युरिटीचे कमाल वय 65 वर्षे आहे. पॉलिसी जितकी वर्षे सुरू आहे, त्यापेक्षा 3 वर्षे कमी प्रीमियम भरावा लागेल. म्हणजेच जर तुमची 23 वर्षांची पॉलिसी असेल तर तुम्हाला 22 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. या योजनेत, विमाधारकाला किमान 1 लाख रुपयांची विमा रक्कम मिळते. कमाल विम्याच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. या विम्यामध्ये तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम भरू शकता. डेथ बेनिफिट काय आहेत? या पॉलिसीमध्ये डेथ बेनिफिट उपलब्ध आहे. पॉलिसी पूर्ण होण्यापूर्वी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, कंपनी प्रीमियम जमा करते. मॅच्युरिटीपूर्वी प्रीमियम सुरु असेपर्यंत दरवर्षी विमा रकमेच्या 10 टक्के रक्कम नॉमिनीला दिली जाते. ही पॉलिसी मुलांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. हेही वाचा- India@75 : ब्रिटीशांची झोप उडवणाऱ्या ‘या’ 5 महिलांचं कार्य देश कधीच विसरू शकणार नाही दरमहा 122 रुपयांची गुंतवणूक करून मिळतील 26 लाख- समजा तुम्ही वयाच्या 30व्या वर्षी ही पॉलिसी खरेदी केली आहे.
- वय: 30 वर्षे
- मूळ विमा रक्कम: 10 लाख रुपये
- पॉलिसीचा कार्यकाळ: 25 वर्षे
- मृत्यू विम्याची रक्कम: 11 लाख रुपये
- प्रीमियम मासिक: 3723 रुपये
- प्रीमियम त्रैमासिक: 11170 रुपये
- प्रीमियम सहामाही:.22102 रुपये
- प्रीमियम वार्षिक: 43726 रुपये
- मॅच्युरिटीवर एकूण रक्कम: 26 लाख रुपये
यामध्ये विम्याची रक्कम 10 लाख आहे. बोनस 11.50 लाख रुपये आहे. तर FAB सुमारे 4.50 लाख रुपये आहे. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला 43726 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागेल. हे मासिक आधारावर 3644 रुपये असेल. म्हणजेच जर तुम्ही दररोज 122 रुपये वाचवत असाल तर तुम्ही या पॉलिसीचा लाभ घेऊ शकता.