जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LIC IPO : LIC ची तिसऱ्या तिमाहीत बंपर कमाई, नेट प्रॉफिट 258 पटीने वाढला

LIC IPO : LIC ची तिसऱ्या तिमाहीत बंपर कमाई, नेट प्रॉफिट 258 पटीने वाढला

LIC IPO : LIC ची तिसऱ्या तिमाहीत बंपर कमाई, नेट प्रॉफिट 258 पटीने वाढला

एलआयसीच्या नफ्यात मोठी वाढ होण्याचे कारण म्हणजे त्यांनी बदललेली पॉलिसी. LIC ने फंड्स रिडिस्ट्रिब्युयशन पॉलिसीमध्ये बदल केले आहे ज्यामुळे त्याच्या नफ्यात मोठी वाढ झाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 मार्च : आयपीओ संदर्भात सध्या खूप चर्चेत असलेल्या एलआयसीने शुक्रवारी जाहीर केले की चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत (LIC Q3 Result) त्यांचा नफा 258 पटीने वाढला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या (2020-21) याच तिमाहीत 90 लाख रुपयांच्या नफ्याच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत 234.9 कोटी रुपयांचा नफा (LIC Profit) झाला आहे. एवढेच नाही तर एलआयसीचा विमा व्यवसायही झपाट्याने वाढला आहे. पहिल्या वर्षाच्या प्रीमियमवर आधारित डिसेंबर 2021-22 तिमाहीत LIC ला 8748.55 कोटी रुपयांचा प्रीमियम प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ते 7957.37 कोटी रुपये होते. डिसेंबर 2021-22 तिमाहीत नूतनीकरण प्रीमियम 56,822.49 कोटी रुपये होता, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत 54,986.72 कोटी रुपये होते. देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी LIC चा IPO येणार आहे. Property खरेदी करण्याआधी नक्की तपासून पाहा हे 5 दस्तावेज, नाहीतर होऊ शकते फसवणूक वेगवेगळ्या रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसीच्या नफ्यात मोठी वाढ होण्याचे कारण म्हणजे त्यांनी बदललेली पॉलिसी. LIC ने फंड्स रिडिस्ट्रिब्युयशन पॉलिसीमध्ये बदल केले आहे ज्यामुळे त्याच्या नफ्यात मोठी वाढ झाली. जर आपण 9 महिन्यांच्या नफ्याबद्दल बोलायचे, तर एप्रिल-डिसेंबर 2021 मध्ये एलआयसीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर सुमारे 232 पटीने वाढला आहे. LIC ला एप्रिल-डिसेंबर 2020 मध्ये 7.08 कोटी रुपयांचा नफा झाला होता, तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत 1,642.78 कोटी रुपयांचा नफा झाला होता. भाडं न देताच पळून गेला भाडेकरू; 50 तास कचरा साफ करताना दिसलं भयंकर दृश्य, घरमालक हादरलाच! सेबीकडून आयपीओला ग्रीन सिग्नल बाजार नियामक सेबीने एलआयसीच्या आयपीओला मंजुरी दिली आहे मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. बाजार नियामकाकडे दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मसुद्यानुसार, सरकार LIC च्या IPO अंतर्गत 31 कोटी इक्विटी शेअर्स विकणार आहे. इश्यूचा एक भाग अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. तसेच, पॉलिसीधारकांसाठी इश्यू आकाराच्या 10 टक्क्यांपर्यंत राखीव असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात