जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LIC IPO: पॉलिसीधारकांना आयपीओसाठी पॅन अपडेट करण्याचा आज शेवटचा दिवस; चेक करा प्रोसेस

LIC IPO: पॉलिसीधारकांना आयपीओसाठी पॅन अपडेट करण्याचा आज शेवटचा दिवस; चेक करा प्रोसेस

LIC IPO: पॉलिसीधारकांना आयपीओसाठी पॅन अपडेट करण्याचा आज शेवटचा दिवस; चेक करा प्रोसेस

LIC IPO: पॉलिसीधारकांना आयपीओसाठी अर्ज करायचा असेल, तर एलआयसीच्या वेबसाइटनुसार, त्यांना प्रथम एलआयसीच्या साइटवर त्यांचा पॅन अपडेट करावा लागेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 फेब्रवारी : गुंतवणूकदार एलआयसीच्या आयपीओची (LIC IPO) आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेषत: एलआयसी पॉलिसीधारक (LIC Policyholders) अधिक उत्साहित आहेत. आयपीओमध्ये त्यांच्यासाठी 10 टक्के आरक्षण हे कारण आहे. पण या राखीव कोट्याचा फायदा घेण्यासाठी एक काम करावं लागणार आहे. पॉलिसीधारकांनी एलआयसीच्या साइटला भेट देऊन त्यांचा पॅन अपडेट (PAN Update) करावा. ज्यांनी पॅन अपडेट केला त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. पॅन अपडेटची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी आहे. म्हणजे तुमच्याकडे फक्त आजचा दिवस शिल्लक आहे. तुम्ही एलआयसीचे पॉलिसीधारक असाल आणि आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर साइटवर त्वरित तुमचा पॅन अपडेट करा. आतापर्यंत, LIC च्या साइटवर 70 लाखांहून अधिक लोकांनी त्यांचे पॅन अपडेट केले आहेत. यावरून, किती लोक त्यांचे पॅन अपडेट करत आहेत याची कल्पना येऊ शकते. Personal Loan मुदतीआधी बंद करायचं आहे का? किती दंड लागतो आणि क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होतो? चेक करा पॅन लिंक करणे आवश्यक जर पॉलिसीधारकांना आयपीओसाठी अर्ज करायचा असेल, तर एलआयसीच्या वेबसाइटनुसार, त्यांना प्रथम एलआयसीच्या साइटवर त्यांचा पॅन अपडेट करावा लागेल. एलआयसीने सार्वजनिक नोटीसमध्ये म्हटले आहे की, आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी, पॉलिसीधारकांना कंपनीच्या रेकॉर्डमध्ये त्यांचा पॅन बरोबर असल्याची खात्री करावी लागेल. तसेच भारतातील कोणत्याही IPO मध्ये सहभागी होण्यासाठी गुंतवणूकदाराचे डिमॅट खाते असणे अनिवार्य आहे. Finance Tips : तुमच्या पैशाचं असं करा नियोजन? आर्थिक संकटात अडकणार नाही असं करा पॅन कार्ड लिंक » सर्व प्रथम एलआयसीच्या अधिकृत वेबसाइट https://licindia.in/ वर जा. » येथे तुम्हाला ऑनलाइन पॅन नोंदणीचा ऑप्शन मिळेल. तो निवडा » ऑनलाइन पॅन नोंदणीचे पेज उघडताच, proceed या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर नोंदणी पेजवरील proceed या ऑप्शनवर क्लिक करा. » तुमचा ईमेल, पॅन, मोबाइल नंबर आणि एलआयसी पॉलिसी क्रमांक याची माहिती भरा. » बॉक्समध्ये captcha कोड टाका. » तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठवण्याची विनंती करा. » तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होताच, तो सबमिट करा. » सबमिट केल्यानंतर यशस्वी नोंदणी झाल्याचा एसएमएस प्राप्त होईल. तुमचा पॅन एलआयसीच्या रेकॉर्डमध्ये अपडेट झाला की नाही असं तपासू शकता » https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus या लिंकवर जा. » पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन तपशील आणि captcha कोड टाका. नंतर सबमिट वर क्लिक करा » पॅन अपडेटबाबत माहिती तुम्हाला दिसेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात