Home /News /money /

LIC Bachat Plus Plan: एलआयसीची पॉलिसी एक फायदे अनेक; इन्शुरन्स, बचत, कर्ज सुविधा एकाच पॉलिसीमध्ये

LIC Bachat Plus Plan: एलआयसीची पॉलिसी एक फायदे अनेक; इन्शुरन्स, बचत, कर्ज सुविधा एकाच पॉलिसीमध्ये

LIC Bachat Plus Plan: एलआयसी बचत प्लस पॉलिसीमध्ये सुरक्षेसोबतच बचतीचीही हमी दिली जाते. या पॉलिसीअंतर्गत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते.

    मुंबई, 18 मे : गुंतवणुकीबाबत आणि विमा पॉलिसीबाबत लोक आता फार जागृत झाले आहे. विविध योजनांमध्ये गुंतवणूक (Investment Options) करुन भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वांची धडपड सुरु असते. मात्र गुंतवणूक आणि विमा पॉलिसी (Insurance Policy) एकत्र मिळाली तर गुंतवणूकदारांना नक्कीच फायदा होईल. अशीच एक LIC ची पॉलिसी (LIC Policy) आहे, त्याबद्दल आज माहिती घेऊयात. एलआयसीकडून पॉलिसी घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एलआयसीकडे सर्वाधिक पॉलिसीधारक आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या सुविधा लक्षात घेऊन कंपनी वेळोवेळी नवनवीन पॉलिसी आणत असते. या पॉलिसींद्वारे सर्वसामान्यांना बचतीबरोबरच सुरक्षिततेचाही लाभ मिळतो. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या अशाच एका पॉलिसीबद्दल माहिती घेऊ जी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. झी बिझनेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे. काय आहे LIC बचत प्लस पॉलिसी? एलआयसी बचत प्लस पॉलिसीमध्ये सुरक्षेसोबतच बचतीचीही हमी दिली जाते. या पॉलिसीअंतर्गत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. दुसरीकडे, पॉलिसीधारक पॉलिसी संपेपर्यंत जिवंत राहिल्यास, मुदतपूर्तीनंतर, पॉलिसीधारकाला एकरकमी रक्कम मिळते. Whatsapp वर दोन मिनिटात मिळवा होम लोन; HDFC बँकेची खास सुविधा, चेक करा प्रोसेस प्रीमियम एकाच वेळी जमा केला जाऊ शकतो या पॉलिसी अंतर्गत, तुम्ही एकाच वेळी प्रीमियम जमा करू शकता किंवा 5 वर्षांच्या मर्यादित कालावधीसाठी प्रीमियम भरू शकता. या योजनेअंतर्गत, तुम्ही वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक प्रीमियम भरू शकता. कर्ज घेण्याची सोय ग्राहकांना कर्ज घेण्याची सुविधाही या पॉलिसीमुळे मिळते. पॉलिसीचे 3 महिने पूर्ण झाल्यानंतर किंवा फ्री लूक कालावधी पूर्ण झाल्यानंतर सिंगल प्रीमियम पर्यायामध्ये कर्ज मिळू शकते. तर मर्यादित प्रीमियम पेमेंट पर्यायामध्ये, किमान 2 वर्षे प्रीमियम भरल्यानंतर कर्ज उपलब्ध होईल. बँकेत FD करताना 'या' गोष्टींचा विचार करा; योग्य तपासणी न करता निर्णय घेतल्यास तोटा होण्याची शक्यता अशा प्रकारे तुम्ही LIC बचत प्लस पॉलिसी घेऊ शकता जर तुम्हाला या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंट करू शकता. तुम्ही www.licindia.in वरूनही पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकता. याशिवाय आयकर कलम 80C अंतर्गत यावर सूटही मिळू शकते. या पॉलिसीमध्ये किमान विमा रक्कम 1 लाख रुपये आहे आणि कमाल मर्यादा नाही.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, LIC, Money

    पुढील बातम्या