Home /News /money /

Whatsapp वर दोन मिनिटात मिळवा होम लोन; HDFC बँकेची खास सुविधा, चेक करा प्रोसेस

Whatsapp वर दोन मिनिटात मिळवा होम लोन; HDFC बँकेची खास सुविधा, चेक करा प्रोसेस

HDFC ने या महिन्यात आतापर्यंत दोनदा गृहकर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. 9 मे 2022 रोजी, HDFC ने गृहकर्जावरील व्याजदरात 0.30 टक्के वाढ जाहीर केली. आता बँकेचा किमान गृहकर्जाचा व्याजदर 7 टक्क्यांवर गेला आहे.

    मुंबई, 18 मे : घर घेताना होम लोनची आवश्यकता जवळपास सगळ्यांनाच असते. होम लोन घेताना कागदपत्रांची जुळवाजुळव, बँकेत फेऱ्या मारणं हे थोडं वेळखाऊ काम आहे. त्यामुळे अनेकदा होम लोन घेताना लोक कंटाळून या प्रोसेसला कंटाळून जातात. त्यामुळेच HDFC ने मंगळवारी होम लोनसाठी (Home Loan) नवीन प्रोडक्ट लाँच केला आहे. 'स्पॉट ऑफर' असं या नव्या सर्व्हिसला नाव देण्यात आले आहे, ज्याची सुविधा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध असेल. व्हॉट्सअॅपवरील स्पॉट लोन (Whtasapp Spot Loan) अंतर्गत, पात्र कर्जदारांना 2 मिनिटांच्या आत कर्ज मंजूरी मिळेल. यासाठी कर्जदारांना +91 98670 00000 नंबरवर व्हॉट्सअॅप मेसेज करावा लागेल आणि काही महत्त्वाची माहिती शेअर करावी लागेल. टीव्ही 9 हिंदीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. तुम्ही शेअर केलेल्या माहितीच्या आधारे पात्रता ठरवली जाईल. या आधारावर, तात्काळ गृहकर्ज (Home Loan) पत्र तयार केले जाईल. व्हॉट्सअॅपवर स्पॉट होम लोनची सुविधा फक्त पगारदार व्यक्तींसाठी उपलब्ध असेल. तुम्हालाही या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. ICICI बँकेकडून पुन्हा एकदा FD व्याजदरात वाढ; 20 बेसिक पॉईंटपर्यंत वाढ, तुम्हाला कसा होईल फायदा प्रोसेस कशी आहे? >> सर्वप्रथम, +91986700000000 WhatsApp नंबरवर 'Hi' पाठवा, ज्यामुळे कर्ज प्रक्रिया सुरू होईल. >> प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, Menu मधून New Loans निवडा. >> नंतर स्पॉट ऑफर निवडा (न्यू) >> एम्प्लॉयमेंट कॅटगरीमध्ये सॅलरिड किंवा सेल्फ एम्पॉईड निवडा. >> रहिवासी पत्त्यामध्ये, भारतीय आणि एनआरआय यापैकी एक निवडा. >> तुमच्या निवासी पत्त्याचा पिनकोड टाका. >> पॅन कार्डनुसार तुमचे पूर्ण नाव भरा. >> टर्म आणि अटी स्वीकारून पुढे जा, त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती उघड होईल. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा. >> या दरम्यान ओटीपी तयार होईल जो एंटर करावा लागेल. >> तुमचे एकूण मासिक उत्पन्न सांगा आणि तुमच्या वर्तमान EMI बद्दल माहिती देखील शेअर करा. >> या सर्व माहितीच्या आधारे, हे मूळ रकमेचे कर्ज मंजूरी पत्र तुम्हाला PDF स्वरूपात शेअर केले जाईल. >> ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला या कर्जाबाबत एचडीएफसीशी संपर्क साधला जाईल आणि पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल. CIBIL Score कमी असला तरी घेता येईल पर्सनल लोन, या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच एचडीएफसीकडून महिनाभरात व्याजदरात दोनदा वाढ HDFC ने या महिन्यात आतापर्यंत दोनदा गृहकर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. 9 मे 2022 रोजी, HDFC ने गृहकर्जावरील व्याजदरात 0.30 टक्के वाढ जाहीर केली. आता बँकेचा किमान गृहकर्जाचा व्याजदर 7 टक्क्यांवर गेला आहे. यापूर्वी 1 मे रोजी HDFC ने RPLR (रिटेल प्राइम लेंडिंग रेट) वाढवले ​​होते. ही वाढ 5 बेसिस पॉईंट्सनी करण्यात आली, त्यानंतर किमान व्याजदर 6.70 टक्क्यांवरून 6.75 टक्के झाला.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Hdfc bank, Home Loan, Money

    पुढील बातम्या