जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LIC Aam Aadmi Bima Scheme: केवळ 100 रुपयांच्या गुंतवणूक अन् मिळेल 75 हजार रुपयांचा लाभ, समजून घ्या सोप्या शब्दात

LIC Aam Aadmi Bima Scheme: केवळ 100 रुपयांच्या गुंतवणूक अन् मिळेल 75 हजार रुपयांचा लाभ, समजून घ्या सोप्या शब्दात

LIC Aam Aadmi Bima Scheme: केवळ 100 रुपयांच्या गुंतवणूक अन् मिळेल 75 हजार रुपयांचा लाभ, समजून घ्या सोप्या शब्दात

LIC Aam Aadmi Bima Scheme: केवळ 100 रुपयांच्या गुंतवणूक अन् मिळेल 75 हजार रुपयांचा लाभ, समजून घ्या सोप्या शब्दात

LIC Aam Aadmi Bima Scheme: एलआयसीची ‘आम आदमी विमा योजना’ ही विमा संरक्षण योजना आहे. विशेषत: असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई**, 1****6** ऑगस्ट : एलआयसी समाजातील विविध स्तरातील घटकांना समोर ठेवून विविध योजना बनवत असते. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत. ‘एलआयसी आम आदमी विमा योजना’ (LIC Aam Aadmi Bima Scheme) असं या योजनेचं नाव आहे. ही एलआयसीची विमा संरक्षण योजना आहे. विशेषत: असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना आर्थिक स्तरावर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. याशिवाय हंगामी बेरोजगारीमुळंही त्यांना खूप त्रास होतो. त्याच वेळी, देशात अशा लोकांची संख्या देखील खूप जास्त आहे, जे भूमिहीन कुटुंबांशी संबंधित आहेत. या सर्व लोकांना जीवन जगताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. अशा परिस्थितीत LIC ची ही योजना असंघटित क्षेत्र आणि गरीब भूमिहीन कुटुंबांना विमा संरक्षण देण्याचं काम करते. आज आपण या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया - एलआयसीच्या या प्लॅनमध्ये तुम्ही 100 रुपयांचा प्रीमियम भरून 75,000 रुपयांचं विमा संरक्षण घेऊ शकता. या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना विमा संरक्षणाशिवाय इतर अनेक सुविधा मिळतात.या योजनेंतर्गत सरकार तुमच्या 50 टक्के रक्कम भरतं. म्हणजेच, योजनेतील प्रीमियमची एकूण रक्कम 200 रुपये असेल, तर यामध्ये विमाधारकाकडून 100 रुपये घेतले जातात. त्याच वेळी सरकार उर्वरित 100 रुपये प्रीमियम भरतं. हेही वाचा:   PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! केंद्र सरकारनं वाढवली KYC ची तारीख, घरबसल्या करा ई-केवायसी या योजनेअंतर्गत, जर विमाधारकाचा नैसर्गिक मृत्यू झाला असेल. तर अशा परिस्थितीत नॉमिनीला 30,000 रुपये दिले जातात. जर पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत नॉमिनीला 75 हजार रुपये दिले जातात. जर विमाधारक पूर्णपणे कायमचा अपंग झाला. तर अशा परिस्थितीत, त्यानं ठरवलेल्या नॉमिनीला 75 हजार रुपये दिले जातात. मात्र, या योजनेत अपंगत्वाचे अनेक निकष निश्चित करण्यात आले आहेत. जर विमाधारक एका डोळ्यानं किंवा एका बोटानं अक्षम असेल. अशा स्थितीत त्याला 37 हजार रुपये दिले जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LIC , scheme
  • First Published :
जाहिरात
जाहिरात