मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आर्थिक मंदीचा फटका? मेटानंतर आता amazon च्या कर्मचाऱ्यांना काढलं

आर्थिक मंदीचा फटका? मेटानंतर आता amazon च्या कर्मचाऱ्यांना काढलं

Layoffs 2022: ट्विटर मेटानंतर आता आणखी एक मोठ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना काढलं

Layoffs 2022: ट्विटर मेटानंतर आता आणखी एक मोठ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना काढलं

Layoffs 2022: ट्विटर मेटानंतर आता आणखी एक मोठ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना काढलं

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदीचं सावट आहे. एकापाठोपाठ एक आंतरराष्ट्रीय कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. आधी ट्विटर, मग मेटा आणि आता अॅमेझॉनमधील कर्मचाऱ्यांची कपात सुरू झाली आहे.

आता ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने आपल्या स्टाफला घरी पाठवण्याची तयारी केली आहे. गेल्या आठवड्यात, कंपनीने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक मेल पाठवला यामध्ये नव्या भरती थांबवण्यात आल्या आहेत. तर आता कर्मचाऱ्यांची कपात सुरू केली आहे.

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, अॅमेझॉनमध्ये काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर जेमी झांग यांनी लिंक्डइनवर लिहिलं की, त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आलं. याशिवाय एका माजी कर्मचाऱ्याच्या पोस्टमध्येही संपूर्ण रोबोटिक्स टीमला पिंक स्लीप देऊन घरी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हा तर अन्याय! अमेरिकेपेक्षा भारतीयांना Blue tick साठी मोजावे लागणार जास्त पैसे

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 3,766 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत आकडेवारी अजून समोर आली नाही. याआधी ट्विटरने 50 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना घरी बसवलं. तर मेटाने 11 हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठवल्याची माहिती मिळाली आहे.

याव्यतिरिक्त, वॉल स्ट्रीट जर्नल (डब्ल्यूएसजे) च्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की कंपनीने आपल्या काही नफा कमावणाऱ्या युनिट्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतरत्र नोकरी शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत, कारण त्यांचे प्रकल्प एकतर बंद केले जाऊ शकतात किंवा लवकरच निलंबित केले जाऊ शकतात.

Twitter वर आता ब्ल्यू नाही तर Gray Tick असेल ऑफिशियल अकाउंटची ओळख, अशाप्रकारे मिळवा

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आर्थिक स्थिती नीट नसल्याने अनेक कंपन्या तोट्यात आहेत. याशिवाय होणाऱ्या खर्चात कपात करण्यासाठी कंपन्या असे निर्णय घेत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे.

First published:

Tags: Amazon, Facebook, Job, Job alert, Twitter