Home /News /money /

भारतात नोकरीची संधी वाढणार! 800 कोटींची गुंतवणूक करणार ही कंपनी

भारतात नोकरीची संधी वाढणार! 800 कोटींची गुंतवणूक करणार ही कंपनी

सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कारण सध्या चीनमध्ये कार्यरत असणाऱ्या काही कंपन्या भारतामध्ये त्यांचे व्यवहार सुरू करण्याच्या विचारात आहेत.

    नवी दिल्ली, 16 मे : कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे देशभरातील विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याचे संकट ओढावले आहे. मात्र या तणावाच्या परिस्थितीत एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कारण सध्या चीनमध्ये कार्यरत असणाऱ्या काही कंपन्या भारतामध्ये त्यांचे व्यवहार सुरू करण्याच्या विचारात आहेत. ज्यानंतर भारतामध्ये रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. दरम्यान मोबाइल उपकरण बनवणारी कंपनी लाव्हा इंटरनॅशनलने शुक्रवारी अशी माहिती दिली की, चीनमधून त्यांचा कारभार भारतात आणणार आहेत. भारतामध्ये सध्या झालेल्या नीतिगत बदलानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. (हे वाचा-स्वस्त घर खरेदीसाठी मोदी सरकारच्या या योजनेचा घेऊ शकाल फायदा, वाचा सविस्तर) या कंपनीने मोबाइल फोन डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंगचा विस्तार करण्यासाठी पुढील 5 वर्षांसाठी 800 कोटींच्या गुंतवणुकीची योजना बनवली आहे. लाव्हा इंटरनॅशनलचे अध्यक्ष हरी ओम राय यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्पादन डिझाइन क्षेत्रामध्ये चीनमध्ये त्यांचे कमीत कमी 600 ते 650 कर्मचारी आहेत. आता त्यांनी हे काम भारतात विस्थापित केले आहे. चीनमधील त्यांच्या कारखान्यातून जगभरात मोबाइल फोनची निर्यात केली जायची, आता हे काम भारतातून करणार असल्याचं ते म्हणाले. भारतात येणार 1000 अमेरिकन कंपन्या विविध अमेरिकन कंपन्यांना भारतात आण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एप्रिल महिन्यात अशा 1000 पेक्षा जास्त मॅन्यूफॅक्चरिंग कंपन्यांकडे भारताकडून संपर्क करण्यात आला आहे, आणि त्यांनी त्यांचे व्यवहार चीनमधून हटवून भारतात आणण्याची ऑफर देण्यात आली आहे. सरकार मुख्यत: मेडिकल इक्विपमेंट, फूड प्रोसेसिंग यूनिट, टेक्सटाइल्स, लेदर आणि ऑटो पार्ट्स निर्मात्या कंपन्यांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातच ट्रम्प प्रशासनाचा आरोप आहे की, चीनमध्ये अद्याप कोरोनाचा समुळ नाश झालेला नाही आहे. या आरोपामुळे चीनमधील व्यवहारांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या