Home /News /money /

सुवर्णसंधी! सोनं आणखी 2000 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता, 3 दिवसांत 7 वर्षांमधील सर्वात मोठी घसरण

सुवर्णसंधी! सोनं आणखी 2000 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता, 3 दिवसांत 7 वर्षांमधील सर्वात मोठी घसरण

सोनेखरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधीचे दिवस आहेत. सध्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजारानंतर आता जगभरातील सोन्याच्या किंमतीमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.

    नवी दिल्ली, 29 फेब्रुवारी : सोनेखरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधीचे दिवस आहेत. सध्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजारानंतर आता जगभरातील सोन्याच्या किंमतीमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार Coronavirus मुळे जागतिक व्यावारावर परिणाम करणाऱ्या अनेक व्यवसायातील उपक्रम कमी झाले आहेत. व्यवसायांतील देवाणघेवाण कमी झाली आहे. त्यामुळे शेअर बाजारात घसरण झाली आहे. परिणामी झालेला तोटा भरून काढण्यासाठी गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत शुक्रवारी 5 टक्क्यांनी कोसळली आहे. सोन्याच्या किंमतीत 2013 पहिल्यांदा एवढी मोठी घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, याचा परिणाम दिल्लीतील सराफा बाजारावर सुद्धा होईल. गेल्या काही महिन्यात सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे लग्नसराईच्या दिवसात सुद्धा अनेकांनी सोने खरेदी टाळली आहे किंवा कमी प्रमाणात सोनं खरेदी केलं आहे. गेल्या आठवड्यात 3 दिवसात प्रति तोळा सोन्याची किंमत 1000 रुपयांनी कमी झाली होती. पुढच्या काही दिवसात सोन्याच्या किंमती 2000 रुपयांनी कमी होऊ शकतात. त्यामुळे सोनेखरेदीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा-Coronavirus चा उद्योगांवर परिणाम होऊ नये याची काळजी घेऊ' - निर्मला सीतारामन) शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारात एक तोळा सोन्याच्या किंमतीत 222 रुपयांची घसरण झाली होती. औद्योगिक मागणी घटल्याचा परिणाम चांदीच्या किंमतींवरही झाला आहे. एक किलो चांदीचे दर 60 रुपयांनी कमी झालेत. त्याचवेळी मागच्या 3 दिवसांत सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. शुक्रवारचे सोन्याचे दर शुक्रवारी राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात एक तोळा सोन्याची किंमत 222 रुपयांनी घसरून 43 हजार 358 रुपयांव पोहोचली आहे. शुक्रवारचे चांदीचे दर सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतींमध्येही घसरण पाहायला मिळाली. चांदीचा दर 60 रुपयांनी कमी होत 48 हजार 130 रुपयांवर पोहोचला होता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या