• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Latent View Analytics IPO : GMP आधारावर इश्यूच्या दमदार एन्ट्रीचे संकेत

Latent View Analytics IPO : GMP आधारावर इश्यूच्या दमदार एन्ट्रीचे संकेत

Latent View Analytics IPO ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) आज 345 रुपये आहे, जो कालच्या 350 रुपयांच्या GMP पेक्षा 5 रुपये कमी आहे, असे मार्केट ऑब्झर्व्हरनी सांगितलं.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर : पेटीएमच्या निराशाजनक आयपीओ नंतर गुंतवणूक चिंतेत आहेत. त्यासोबत आगामी इतर आयपीओवरही त्याचा परिणाम होऊ शकतो असा अंदाज शेअर बाजारातील तज्ज्ञ सांगत आहेत. आत लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्स आयपीओच्या (Latent View Analytics IPO) 600 कोटी रुपयांच्या पब्लिक इश्यूचे शेअर अलॉटमेंट झाले आहे. आता सर्वांचे लक्ष IPO लिस्टिंगच्या तारखेकडे लागले आहे. लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्समधील शेअर्सची लिस्टिंग 23 नोव्हेंबर 2021 रोजी अपेक्षित आहे. ग्रे मार्केटच्या आधारावर इनिशियल ऑफरमधून कोणत्या प्रकारच्या लिस्टिंगची अपेक्षा केली जाऊ शकते, यावर नजर टाकुया. Mint च्या अहवालानुसार, मार्केट ऑब्झर्व्हरचा अंदाज आहे की लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्स शेअर्स आज ग्रे मार्केटमध्ये 345 च्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहेत. हाय प्रीमियम स्टॉकच्या मजबूत लिस्टिंगचे संकेत देत आहे. NPS vs APY: नॅशनल पेन्शन योजना की अटल पेन्शन योजना? कोणती योजना आहे फायदेशीर? Latent View Analytics IPO GMP लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्स आयपीओ ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) आज 345 रुपये आहे, जो कालच्या 350 रुपयांच्या GMP पेक्षा 5 रुपये कमी आहे, असे मार्केट ऑब्झर्व्हरनी सांगितलं. मात्र ते पुढे म्हणाले की ग्रे मार्केटमध्ये इतका हाय प्रीमियम संकेत देतो की ग्रे मार्केट पब्लिक इश्यूच्या मजबूत लिस्टिंगची अपेक्षा आहे. ते पुढे म्हणाले की, लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्स IPO ची ग्रे मार्केट किंमत त्याच्या शेअर अलॉटमेंटपासून 300 रुपयांच्या वर राहिली आहे, जे सूचित करते की IPO च्या बिडर्सना हा प्रीमियम ऑफर करणार्‍या या लाइफ सायन्स पब्लिक इश्यूची मजबूत लिस्टिंग असू शकते. Cryptocurrency संदर्भात मोठी अपडेट, वाचा काय होणार भारतीय गुंतवणुकदारांवर परिणाम GMP चा अर्थ काय? GMP नुसार या IPO मधून लिस्टिंग नफा अपेक्षित आहे. LatentView Analytics IPO GMO आज 345 रुपये आहे. यामुळे असं दिसून येत आहे की ग्रे मार्केट लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्स शेअर लिस्टिंगची अपेक्षा सुमारे 542 रुपये (197 + 345) होऊ शकते. GMPनुसार प्रति इक्विटी शेअर रुपये 190 - 197 च्या श्रेणीत आहे म्हणजे गुंतवणूकदाराना 175 टक्क्याहून अधिक लिस्टिंग प्रॉफिट अपेक्षित आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: