जाहिरात
मराठी बातम्या / मनी / भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं? देशातील कोणत्याही भागासाठी पकडू शकता ट्रेन

भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं? देशातील कोणत्याही भागासाठी पकडू शकता ट्रेन

देशातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं?

देशातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं?

Largest Railway Station of India: देशभरात रोज अनेक ट्रेन धावतात. भारतात रेल्वेचं नेटवर्क खूप मोठं आहे. मात्र देशातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं आहे माहितीये का? नाही ना… आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Largest Railway Station of India: तुम्ही अनेकदा ट्रेनमधून प्रवास केला असेल. यासाठी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रेल्वे स्टेशनवर जाऊन उभ राहावं लागलं असेल. तुम्ही अनेक रेल्वे स्टेशन आतापर्यंत पाहिली असतील. मात्र देशातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतंय तुम्हाला माहितीये का? या स्टेशनवर दिवसरात्री चोवीस तार गर्दी राहते. या स्टेशनवर दररोज 600 ट्रेन धावतात. तर येथून दररोज जवळपास 10 लाख लोक आपला प्रवास सुरु करतात. आज आपण या अनोख्या आणि मोठ्या रेल्वे स्टेशनविषयी जाणून घेणार आहोत.

News18लोकमत
News18लोकमत

देशातील सर्वात मोठं रेल्वे जंक्शन

देशातील सर्वात मोठ्या रेल्वे जंक्शनच नाव हावडा आहे. हे देशातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन आहेच, यासोबतच हे सर्वात व्यस्त असणारं रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनवर एकूण 23 प्लॅटफॉर्म आहेत. तर 26 रेल्वे लाइन आहेत. ज्यावरुन रोज जवळपास 600 ट्रेन पास होतात.

सुशोभीकरणातही अव्वल

हावडा जंक्शनला देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्टेशनच्या यादीत जागा मिळाली आहे. कोलकातामधील हे रेल्वे स्टेशन टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 च्या नावाने देखील ओळखलं जातं. हावडाला देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्टेशनच्या यादीत जागा मिळालीये. कोलकातामध्ये हावडासह सियालदह नावाचं अजून एक मोठं रेल्वे स्टेशन देखील आहे. यासोबतच संतरागाछी, शालीमार आणि कोलकाता रेल्वे स्टेशनही आहे.

Railway Rules: चालत्या ट्रेनमधून मोबाईल पडला तर काय करावं? एका क्लिकवर घ्या जाणून

कधी बांधलं गेलं हे स्टेशन?

हावडा रेल्वे जंक्शन पूर्व विभागांतर्गत येते. या जंक्शनवरून दररोज 350 हून अधिक गाड्या त्यांच्या प्रवासासाठी जातात. तर एवढ्याच गाड्या येथे थांबतात देखील. देशातील सर्वात जुने रेल्वे स्थानक होण्याचा मानही या जंक्शनला मिळाला आहे. या रेल्वे स्थानकाची इमारत 1854 साली बांधण्यात आली. हे स्टेशन हुगळी नदीवर बांधलेल्या पुलाद्वारे कोलकाता मुख्य शहराला जोडते. येथून देशाच्या जवळजवळ प्रत्येक भागासाठी गाड्या पकडल्या जाऊ शकतात. या जंक्शनमध्ये एकाच वेळी जास्तीत जास्त गाड्या ठेवण्याची क्षमता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात