जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Lakshmi Vilas Bank: ग्राहकांसाठी चांगली बातमी! ठेवीदारांची परतफेड करण्याइतकी रक्कम बँकेकडे उपलब्ध

Lakshmi Vilas Bank: ग्राहकांसाठी चांगली बातमी! ठेवीदारांची परतफेड करण्याइतकी रक्कम बँकेकडे उपलब्ध

Lakshmi Vilas Bank: ग्राहकांसाठी चांगली बातमी! ठेवीदारांची परतफेड करण्याइतकी रक्कम बँकेकडे उपलब्ध

लक्ष्मी विलास बँकेवर (Lakshmi Vilas Bank) आरबीआयने (RBI) निर्बंध आणल्यानंतर बँकेतील ठेवीदारांच्या पैशांचं काय होणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India RBI) ने नियुक्त केलेले लक्ष्मी विलास बँकेचे (Lakshmi Vilas Bank) प्रशासक टीएन मनोहरन (TN Manoharan) यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. ग्राहकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे मनोहरन यांनी म्हटले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, ठेवीदारांच्या (Depositors) पैशांची परतफेड करण्यासाठी बँकेकडे पर्याप्त रक्कम आहे. त्यांनी असे म्हटले आहे की ठेवीदारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे मनोहरन यांनी अशी माहिती दिली आहे की, डीबीएस इंडिया (DBS India) मध्ये लक्ष्मी बँकेचे विलीनीकरण वेळेतच पूर्ण होईल. LVB कडे आहे 20,000 कोटींची ठेव आरबीआय नियुक्त प्रशासर टीएन मनोहरन यांनी अशी माहिती दिली आहे की, लक्ष्मी विलास बँक (LVB) कडे  20,000 कोटींची ठेव आहे. त्याचप्रमाणे बँकेने 17,000 कोटी रुपये कर्ज म्हणून दिले आहेत. 17 नोव्हेंबर रोजी आर्थिक संकटात सापडलेल्या लक्ष्मी विलास बँकेवर आरबीआयने मोरेटोरियम  (Moratorium) लागू केला होता. 16 डिसेंबर 2020 पर्यंत हे निर्बंध असणार आहेत. LVB चं संचालक मंडळ (Board of Directors LVB) रिझर्व बँकेने (RBI) बरखास्त केलं होतं. कारण त्यांच्याकडे बँकेला पुनरुज्जीवन देणारा कुठलाही प्लॅन नव्हता. मोरेटोरियम कालावधी दरम्यान ग्राहक 25,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेतून काढू शकणार नाही आहेत. (हे वाचा- देशातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये मोदी सरकार पाठवत आहे 1.24 लाख रुपये?) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिआने लक्ष्मी विलास बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे. आरबीआयच्या मते डीबीएस लक्ष्मी विलास बँकेमध्ये 2500 कोटी  रुपयांची गुंतवणूक करेल. याअंतर्गत लक्ष्मी विलास बँकेच्या 560 शाखांच्या माध्यमातून डीबीएस बँक LVBच्या गृह, वैयक्तिक आणि स्मॉल स्केट इंडस्ट्री कर्जाचा ताबा घेईल. गेल्या 3 वर्षामध्ये आर्थिक संकटात असल्यामुळे लक्ष्मी विलास बँकेची नेटवर्थ संपुष्टात आली आहे. पुनरुज्जीवनासाठी कोणतीही योजना नसल्याने, कमी होणारी कर्ज आणि वाढणारे नॉन-परफॉर्मिंग एसेट्स (NPA) यामुळे बँकेचे नुकसान वाढतच जाईल, असा अंदाज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात