मराठी बातम्या /बातम्या /मनी /

शेअर मार्केटमध्ये 'हा' स्टॉक सुस्साट, तिप्पट रिटर्नमुळे गुंतवणूकदारांची चांदी

शेअर मार्केटमध्ये 'हा' स्टॉक सुस्साट, तिप्पट रिटर्नमुळे गुंतवणूकदारांची चांदी

 गेल्या काही वर्षांत अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न्स मिळवून दिले आहेत.

गेल्या काही वर्षांत अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न्स मिळवून दिले आहेत.

गेल्या काही वर्षांत अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न्स मिळवून दिले आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : शेअर बाजारातील अनेक गुंतवणूकदारांना कमी कालावधीत भरपूर रिटर्नची अपेक्षा असते. अनेक कंपन्यांच्या शेअर्सनं कमी आणि दीर्घकालीन मुदतीत मोठा नफा कमवला आहे. गेल्या काही वर्षांत अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या यादीत 'कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक लिमिटेड'च्या शेअर्सचा समावेश होतो.

गेल्या काही आठवड्यांपासून या कंपनीचा स्टॉक दररोज अप्पर सर्किटवर दिसत आहे. सोमवारी (31 ऑक्टोबर) पाच टक्क्यांच्या वाढीसह या कंपनीचा स्टॉक बंद झाला. शेअर मार्केट बंद होताना बीएसईवर कंपनीच्या एका शेअरची किंमत 650.90 रुपये झाली होती. कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक लिमिटेड'च्या शेअर्सचा हा मागील 52 आठवड्यांतील उच्चांक आहे.

एक वर्ष असो किंवा एक महिना, मिळतील दमदार रिटर्न्स

Confidence Futuristic Energtech Limited च्या स्टॉकनं गेल्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 129 टक्क्यांचे रिटर्न्स मिळवून दिले आहेत. सहा महिन्यांच्या कालावधीचा विचार केला तर, गुंतवणूकदारांना 331 टक्के रिटर्न्स मिळाले आहेत. 2022 मध्ये आतापर्यंत, कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 790 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एका वर्षात या स्टॉकनं गुंतवणूकदारांना एक हजार 154 टक्क्यांचे बंपर रिटर्न्स मिळवून दिले आहेत.

वर्षभरापूर्वी, म्हणजे 1 नोव्हेंबर 2021 रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत 51.90 रुपये होती. जी आता 650.90 रुपये झाली आहे. कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक लिमिटेडनं आता आपल्या शेअर्सचं विभाजन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या संचालक मंडळानं कंपनीचे शेअर्स विभाजित करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. 1:2 या प्रमाणात हे स्टॉक स्प्लिट केले जातील. याचा अर्थ प्रत्येक शेअर होल्डरला प्रत्येक दोन शेअर्सवर एक बोनस शेअर दिला जाईल.

काय आहे कंपनीचा कारभार?

कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक लिमिटेडची स्थापना 1985 मध्ये झाली होती. ही एक पेट्रोलिअम इंजिनीअरिंग कंपनी आहे. नागपूरमध्ये कंपनीचं मुख्यालय आहे. पूर्वी हीच कंपनी 'ग्लोब इंडस्ट्रियल रिसोर्सेस लिमिटेड' म्हणून ओळखली जात असे. 2017 मध्ये, कंपनीचं नाव बदलण्यात आलं.

कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक लिमिटेड कंपनी घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी 'गो गॅस' या ब्रँड अंतर्गत कंपोझिट एलपीजी सिलिंडरचं उत्पादन आणि विक्री करते. याशिवाय, ती ऑक्सिजन, सीएनजी हायड्रोजन आणि सीओ 2 सारख्या हाय प्रेशर सिलिंडरचंही उत्पादन आणि विक्री करते.

कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक लिमिटेडचा इतिहास आणि सध्याची स्थिती पाहता, गुंतवणुकीसाठी ही कंपनी एक चांगला पर्याय ठरू शकते.

First published:

Tags: Share market, Stock Markets