मराठी बातम्या /बातम्या /मनी /#IndiaWantsCrypto: बिटकॉइन्समध्ये गुंतवणूक करायची आहे? Cryptocurrency बाबत सर्व प्रश्नांची उत्तरं घ्या जाणून

#IndiaWantsCrypto: बिटकॉइन्समध्ये गुंतवणूक करायची आहे? Cryptocurrency बाबत सर्व प्रश्नांची उत्तरं घ्या जाणून

वझीरएक्स (WazirX) चे को-फाऊंडर निश्चल शेट्टी (Nishchal Shetty) यांनी 1 नोव्हेंबर 2018 रोजी एक ट्विटर कॅम्पेन सुरू केले होते. इंडिया वॉन्ट्स क्रिप्टो (IndiaWantsCrypto) असं या कॅम्पेनचं नाव होतं. त्याअंतर्गत जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीबाबत सर्वकाही

वझीरएक्स (WazirX) चे को-फाऊंडर निश्चल शेट्टी (Nishchal Shetty) यांनी 1 नोव्हेंबर 2018 रोजी एक ट्विटर कॅम्पेन सुरू केले होते. इंडिया वॉन्ट्स क्रिप्टो (IndiaWantsCrypto) असं या कॅम्पेनचं नाव होतं. त्याअंतर्गत जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीबाबत सर्वकाही

वझीरएक्स (WazirX) चे को-फाऊंडर निश्चल शेट्टी (Nishchal Shetty) यांनी 1 नोव्हेंबर 2018 रोजी एक ट्विटर कॅम्पेन सुरू केले होते. इंडिया वॉन्ट्स क्रिप्टो (IndiaWantsCrypto) असं या कॅम्पेनचं नाव होतं. त्याअंतर्गत जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीबाबत सर्वकाही

पुढे वाचा ...

  मुंबई, 30 जुलै: वझीरएक्स (WazirX) चे को-फाऊंडर निश्चल शेट्टी (Nishchal Shetty) यांनी 1 नोव्हेंबर 2018 रोजी एक ट्विटर कॅम्पेन सुरू केले होते. इंडिया वॉन्ट्स क्रिप्टो (IndiaWantsCrypto) असं या कॅम्पेनचं नाव होतं. या कॅम्पेनमध्ये त्यांनी क्रिप्टोकरन्सीबाबत (Cryptocurrency) जागरुकतेसाठी (Crypto Currency awareness) दररोज एक ट्वीट करायचं ठरवलं होतं. यामुळे देशात क्रिप्टोकरन्सीबाबत मागणी वाढून, सरकार याबाबत नवा कायदा करेल, या आशेने हे कॅम्पेन सुरू करण्यात आले होते. 28 जुलै 2021 रोजी या कॅम्पेनचे 1 हजार दिवस पूर्ण झाले होते. या निमित्ताने त्यांच्या या कॅम्पेनमधील काही ट्वीट्ससमधून आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीची माहिती देत आहोत. सीएनबीसी टीव्ही18 ने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

  एका दशकापूर्वी बिटकॉइनची किंमत ही अवघे काही सेंट्स होती. मात्र आता याची किंमत तब्बल 37,000 डॉलर्सच्या आसपास पोहोचली आहे. एवढ्या कमी काळात एवढी जास्त वाढ झालेली पाहून कित्येक तज्ज्ञांना आश्चर्यचकित केले आहे. शेट्टींच्या मते, बिटकॉइनची एवढी वाढ होण्याला त्याची अॅक्सेसिबिलिटी (Bitcoins Accessibility) हे कारण आहे. बिटकॉइनसाठी तुम्हाला स्वतः कुठेही जाण्याची गरज नाही. तसेच, तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून यात गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ एक मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. शिवाय, बिटकॉइन हे कोणतीही व्यक्ती वा सरकार चालवत नाही.

  बिटकॉइनची एकच अडचण आहे, ती म्हणजे याला कोणतेही स्टॉक किंवा बॉण्ड नसल्यामुळे याची किंमत कशावर ठरते हे बऱ्याच गुतंवणूकदारांना (Crypto investors) माहिती नसते. शेट्टी सांगतात, की बिटकॉइनच्या यूझर नेटवर्कनुसार (Bitcoins User network) त्याची किंमत ठरते. जगात सध्या 4.73 बिलियन इंटरनेट वापरकर्ते आहेत. यांपैकी 100 मिलियन लोक बिटकॉइन वापरतात. म्हणजेच, एकूण वापरकर्त्यांपैकी केवळ 3 टक्के लोक बिटकॉइन्स वापरतात. अजूनही कित्येक लोक बिटकॉइन्स वापरत नाहीत.

  हे वाचा-Alert! 31 जुलैपर्यंत KYC अपडेट करणं आवश्यक, नाहीतर बंद होतील तुमची ही खाती

  सोप्या पद्धतीने अॅक्सेसेबल असले, तरी लोक बिटकॉइन्समध्ये इन्व्हेस्ट करायला घाबरतात. याला कारण म्हणजे, बिटकॉइन्सची मध्येच वाढणारी आणि घसरणारी किंमत. कित्येक वेळा बिटकॉइन्सची किंमत अगदीच अनपेक्षितपणे कोसळली आहे. मात्र शेअर मार्केटप्रमाणेच क्रिप्टोकरन्सीचे प्राईज व्हेरिएशन पाहून त्यात गुंतवणूक करावी, असा सल्ला शेट्टींनी दिला आहे. शेट्टी सांगतात, की क्रिप्टोकरन्सीचे मूल्य चार घटकांवर आधारित असते. यातील सहभागी लोकांची संख्या, प्रोजेक्ट्सची संख्या, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि देशांचा याला असलेला पाठिंबा. या चारही घटकांमध्ये गेल्या वर्षभरात चांगलीच वाढ झाल्याचे शेट्टींनी स्पष्ट केले.

  निश्चल शेट्टी, सहसंस्थापक, WazirX (Image: CNBC-TV18, YouTube)

  निश्चल शेट्टी, सहसंस्थापक, WazirX (Image: CNBC-TV18, YouTube)

  शेट्टींना असा दावा आहे, की काही दिवसांमध्ये क्रिप्टोकरन्सी वापरकर्त्यांची संख्या एक बिलियनपर्यंत पोहोचेल. जगभरातील कित्येक सेलिब्रिटी (Celebrity) आणि आर्टिस्ट (Artists) लोकांना क्रिप्टोवर येण्याचे आवाहन करतील, ज्याला लोक प्रतिसाद देतील, असे शेट्टी म्हणाले. यासोबतच, नॉन फंजीबल टोकन्सच्या (एनएफटी) माध्यमातूनही क्रिप्टो मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एनएफटी (NFT) काही दिवसांमध्येच अनिवार्य होईल असल्याचे शेट्टी म्हणाले.

  काही क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांच्या मते, सरकारची एखादी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) सुरू झाल्यास बिटकॉइन्स सारख्या इतर डीसेंट्रलाईज्ड क्रिप्टोकरन्सींना धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, शेट्टी म्हणतात, की सीबीडीसीचा परिणाम याच्या अगदी उलट होईल. सीबीडीसीमुळे देशातील कित्येक लोक डिजिटल करन्सीच्या (Digital Currency) प्रवाहात येतील. त्यामुळे आरबीआयने (RBI) याबाबत नक्कीच पाऊल उचलायला हवं.

  हे वाचा-सोनंखरेदीसाठी कमी पडतायंत पैसे? आवडीचे दागिने खरेदी करा EMI वर; वाचा सविस्तर

  सरकारने क्रिप्टोकरन्सीवर रेग्युलेशन्स (Cryptocurrency regulations) लागू करावेत, असं शेट्टींचं मत आहे. रेग्युलेशन्समुळे क्रिप्टोमधील व्यवहारांबाबत स्पष्टता येऊन, डिजिटल करन्सी इंडस्ट्रीची वाढ होण्यास मदत होईल. रेल्युलेशन्स लागू केल्यामुळे क्रिप्टोला चालना मिळेल, असंही ते म्हणतात. असं असलं तरी, दुसऱ्या एका ट्विटमध्ये शेट्टी म्हणतात की गुंतवणुकदारांनी रेग्युलेशन्स लागू होण्याची वाट न पाहता क्रिप्टो व्यवहार सुरू करावे. जर इंटरनेटवर रेग्युलेशन्स लागू होईपर्यंत उद्योजक थांबले असते, तर आज देशात एवढे स्टार्टअप तयार झाले नसते. रेग्युलेशन्स लागू होण्यासाठी एक इकोसिस्टीम असणं गरजेचं असतं. त्यामुळेच उद्योजकांनी क्रिप्टोमध्ये स्टार्टअप (crypto Start-up) करावं, ज्यामुळे ही इकोसिस्टीम तयार होईल.

  कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने (Corporate affairs ministry) सर्व कंपन्यांना क्रिप्टोकरन्सीमधून मिळालेली कमाई जाहीर करण्यास सांगितले आहे. हा चांगला निर्णय आहे, ज्यामुळे देशातील लोकांना क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांवर आणि कंपन्यांवर विश्वास निर्माण होण्यास मदत होईल असं शेट्टींना वाटते. जगभरातील कॉर्परेट कंपन्या क्रिप्टोला महत्त्व देऊ लागल्या आहेत. यामुळे क्रिप्टोला फायदा होत असल्याचं शेट्टींनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘व्हिसा’ सारख्या कंपन्या आता बिटकॉइन्सच्या स्वरुपात पेमेंट स्वीकारत आहेत, ही एक चांगली सुरुवात आहे. लोक सध्या सुरक्षित आणि जलद होणाऱ्या पेमेंट मेथड्स वापरत आहेत. बिटकॉइन्सही अशीच पद्धत आहे. त्यामुळे बँकांनीही हा पर्याय उपलब्ध करण्याबाबत विचार करावा, असं शेट्टी म्हणतात. भारतातील बँका अजूनही यादृष्टीने केवळ विचार करत आहेत. जेवढ्या लवकर ते याबाबत निर्णय घेतील, तेवढं त्यांना इतर जगाशी लवकर जुळवून घेता येईल, असंही शेट्टींनी स्पष्ट केलं.

  हे वाचा-इंधनवाढीचा सामान्यांना फटका! पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत सरकारनं दिलं हे स्पष्टीकरण

  क्रिप्टोचा आणखी एक फायदा शेट्टींनी आपल्या ट्विट्सच्या माध्यमातून सांगितला, तो म्हणजे नवउद्योजकांना लवकरात लवकर मिळणारं कॅपिटल. इतर व्हीसी फर्म्सच्या तुलनेत आयसीओ किंवा आयडीओ मार्फत केली जाणारी प्रोसेस ही अधिक सुलभ आणि जलद आहे. क्रिप्टोमधील उद्योजक हे कोणाकडूनही, कुठूनही आणि कमीत कमी वेळात पैसे उभा करू शकतात; असं शेट्टी यांनी स्पष्ट केलं.

  First published:
  top videos

   Tags: Investment, Money, Savings and investments