Home /News /money /

इंधनवाढीचा सामान्यांना फटका! का वाढतायंत पेट्रोल-डिझेलचे दर, सरकारनं दिलं असं स्पष्टीकरण

इंधनवाढीचा सामान्यांना फटका! का वाढतायंत पेट्रोल-डिझेलचे दर, सरकारनं दिलं असं स्पष्टीकरण

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत बोलताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं की, केंद्र सरकारनं गेल्या वर्षभरात पेट्रोल-डिझेलवरील करात कोणतीही वाढ केलेली नाही.

नवी दिल्ली, 29 जुलै: देशात पसरलेल्या कोरोना साथीच्या (Corona Pandemic) संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत, तर अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले. अनेकांचं आर्थिक उत्पन्न घटलं आहे. तर गरीब आर्थिक दुर्बल गटातील असंख्य लोकांसमोर रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला आहे. यातच भर म्हणून इंधनाचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे महागाईही वाढत आहे. देशातील पेट्रोल-डिझेलच्या (Petrol -Diesel Price) दरानं शंभरी केव्हाच पार केली असून, इंधनदराच्या या भडक्यानं सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. देशभरात अनेक शहरांमध्ये पेट्रोल 110 रुपये लिटर दरानं विकलं जात आहे. पेट्रोल आणि डिझेलचे हे दर आतापर्यंतचे उच्चांकी दर आहेत. एप्रिल 2020 पासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात लिटरमागे तब्बल 32 रुपयांची वाढ झाली आहे. इंधनाचे दर वाढल्यानं भाजीपाला, धान्य यांच्याही किंमती वाढत आहेत. एकीकडे कोरोनामुळे आर्थिक टंचाई आणि त्यात महागाईचा मारा या सगळ्या संकटामुळे सर्वसामान्य जनता जेरीस आली आहे. सरकारनं ही दरवाढ कमी करावी अशी आग्रही मागणी जोर धरू लागली आहे. विरोधी पक्षांनीही या इंधनदर वाढीवरून सरकारला धारेवर धरलं असून, विरोधी पक्षातर्फे देशात ठिकठिकाणी सरकारविरुद्ध जोरदार आंदोलन केलं जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं (Central Government) नुकतंच राज्यसभेत (Rajya Sabha) एका लेखी उत्तरात दरवाढीचं कारण स्पष्ट केलं आहे. हे वाचा-Aadhaar Card बनवण्याच्या नियमात बदल, केवळ एक स्लिप देऊन पूर्ण होईल काम पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत बोलताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री (Central Minister of Petroleum and Natural Gas) हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं की, केंद्र सरकारनं गेल्या वर्षभरात पेट्रोल-डिझेलवरील करात कोणतीही वाढ केलेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) कच्च्या तेलाच्या भावांत झालेली वाढ आणि राज्य सरकारं आकारत असलेल्या व्हॅटमुळे इंधनाचे दर वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या इंधनाच्या किंमतीतील चढ-उताराचा मुद्दा केंद्र सरकार वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व्यासापीठांवर मांडत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आधी 26 जून 2010 मध्ये आणि त्यानंतर 19 ऑक्टोबर 2014 पासून तेल कंपन्यांच्या अखत्यारीत देण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमती आणि चलन विनिमय दराच्या आधारे तेल कंपन्या पेट्रोल -डिझेलचे दर निश्चित करतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या दरात होणारी वाढ, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि रुपया आणि डॉलरमध्ये होणारे चढ -उतार यामुळे इंधनाच्या दरात वाढ होत असल्याचं हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं.
First published:

Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel prices continued to rise, Petrol price, Petrol price hike

पुढील बातम्या