जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत लवकर वाढेल पैसा! मिळेल 50 लाखांच्या सम एश्योर्डसह लोनची सुविधा

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत लवकर वाढेल पैसा! मिळेल 50 लाखांच्या सम एश्योर्डसह लोनची सुविधा

पोस्ट ऑफिस योजना

पोस्ट ऑफिस योजना

पोस्टल लाइफ इन्शुरन्स, पोस्ट ऑफिसची सर्वात जुनी योजना आहे. या पॉलिसी घेऊन 4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 फेब्रुवारी: देशातील गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जातो. त्यात गुंतवणुकीसाठी कोणताही धोका नाही. भारतीय पोस्ट ऑफिस वेळोवेळी तुमच्यासाठी अनेक योजना घेऊन येत असते. यामध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतात. ही एक प्रकारची सरकारी योजना आहे. तुम्हालाही जोखीम न घेता सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही तुमची मेहनतीची कमाई पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवू शकता. आज आपण पोस्ट ऑफिसच्या या योजनेविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

पोस्टल जीवन विमा योजना

या योजनेचे नाव पोस्टल लाइफ इन्शुरन्स असे आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 50 लाखांपर्यंतच्या कव्हरेजसह इतर अनेक फायदे मिळतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे PLI ही सर्वात जुनी सरकारी विमा योजना आहे. ब्रिटीश काळात 1 फेब्रुवारी 1884 रोजी याची सुरुवात झाली.

इमरजन्सीमध्ये PPF मधून पैसे कसे काढायचे? काय आहेत नियम? घ्या जाणून

गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय

पोस्ट ऑफिस लाइफ इन्शुरन्स स्कीममध्ये तुम्हाला 2 कॅटेगिरीमध्ये पैसे गुंतवण्याचे ऑप्शन मिळतात. यामध्ये PLI आणि RPLI ऑप्शनची सुविधा मिळते. PLI योजनेअंतर्गत 6 पॉलिसी चालवल्या जातात, त्यापैकी एक संपूर्ण जीवन विमा पॉलिसी आहे. होल लाइफ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत, किमान विमा रक्कम 20,000 रुपये आणि कमाल विमा रक्कम 50 लाख रुपये आहे. तसेच, त्या व्यक्तीला 80 वर्षांपर्यंत एश्योर्ड अमाउंट मिळते. या अगोदर काही कारणाने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला पैसे मिळतात.

लोनची सुविधा

4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या पॉलिसीवर कर्ज देखील घेऊ शकता. जर तुम्ही पॉलिसी दीर्घकाळ चालवू शकत नसाल, तर तुम्ही ती 3 वर्षांनी सरेंडर देखील करु शकता. मात्र 5 वर्षापूर्वी सरेंडर केल्यास बोनस मिळणार नाही, अशी या योजनेची अट आहे. 5 वर्षानंतर सरेंडर केल्यावर, सम अॅश्युअर्डवर आनुपातिक बोनस दिला जातो.

कमी जोखमीसह अधिक रिटर्न्स हवेत? डेट म्युच्युअल फंड आहेत बेस्ट

असा घ्या पॉलिसीचा लाभ

पोस्ट ऑफिस PLI संपूर्ण जीवन विमा पॉलिसी घेण्यासाठी तुमचे वय किमान 19 वर्षे आणि कमाल 55 वर्षे असणे आवश्यक आहे. ही पॉलिसी घेण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइट https://pli.indiapost.gov.in वर जाऊन याचा लाभ घेऊ शकता. यानंतर तुम्ही ही पॉलिसी ऑनलाइनही खरेदी करू शकता. येथे तुम्हाला प्रीमियमचे पेमेंट, पावती आणि इन्कम टॅक्स सर्टिफिकेट प्रमाणपत्र इत्यादी सर्व डिजिटल फॉरमॅटमध्ये मिळतील.

News18लोकमत
News18लोकमत

पोस्टल लाइफ इन्शुरन्सचे फायदे

-तुम्ही किमान 4 वर्षांसाठी पोस्टल लाइफ इन्शुरन्स घेऊ शकता. यानंतर तुम्ही पैसे घेऊ शकता. -या पॉलिसीद्वारे तुम्हाला एश्योर्ड अमाउंटची सुविधा मिळते. -विमाधारकाच्या अनुपस्थितीत, कुटुंबाला किंवा नॉमिनीला पैसे मिळतात. -जर तुम्हाला 3 वर्षानंतर पॉलिसी बंद करायची असेल तर तुम्हाला पॉलिसी सरेंडर करण्याची सुविधा मिळते. -ही पॉलिसी यापूर्वी केवळ सरकारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठीच होती. या दुरुस्तीनंतर ते डॉक्टर, अभियंते, व्यवस्थापन सल्लागार, चार्टर्ड -अकाउंटंट, आर्किटेक्ट, वकील, बँकर्स आणि कर्मचारी इत्यादींसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात