मुंबई, 27 फेब्रुवारी: भविष्य सुरक्षित असावे यासाठी आर्थिक नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. भविष्यातील खर्च हाताळण्यासाठी, एसआयपी, पोस्ट ऑफिस, एफडी आणि आरडी इत्यादीसारख्या स्मॉल सेविंग्समध्ये लोक गुंतवणूक करतात. भविष्यातील खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी डेट फंडातील गुंतवणूक हा एक चांगला पर्याय असू शकतो. डेट फंड हा म्युच्युअल फंडच असतो. यामध्ये, गुंतवणूकदार बँक फिक्स्ड डिपॉझिट किंवा स्मॉल सेविंग्स स्कीमला पर्याय म्हणून सरकारी सिक्योरिटी, कॉर्पोरेट बाँड आणि ट्रेझरी बिलांमध्ये गुंतवणूक करू शकतात. फिक्स्ड डिपॉझिटची मुदत संपताच डेट फंड तुम्हाला एफडी रेटवर चांगले रिटर्न देतात.
RD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनो लक्ष द्या! या बँका देताय 8% व्याज, चेक करा लिस्टकधीही काढू शकता पैसे
डेट फंडमध्ये रिटर्न बहुतेक वेळा एक सारखाच असतो. मार्केटमुळेही त्यांचे रेट्स फारसे बदलत नाहीत. तुम्हाला रिस्क घेण्याची भीती वाटत असेल तर हा तुमच्यासाठी सुरक्षित पर्याय असू शकतो. त्याला लिक्विड फंड असेही म्हणतात. याचे कारण म्हणजे त्यात लिक्विडिटीची समस्या नसते. याचा अर्थ तुम्हाला पाहिजे तेव्हा तुमचे पैसे काढता येतील. तुमचे उत्पन्न स्थिर नसेल तर तुमच्यासाठी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय असू शकतो. तीन वर्षांपूर्वी डेट फंड युनिट्सची विक्री केल्यानंतर जो नफा होतो. त्यामध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लावला जातो.
कमी जोखमीसह मिळते बेस्ट रिटर्न
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हा नेहमीच फायदेशीर सौदा मानला जातो. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक FD किंवा इतर मुदत ठेवींच्या तुलनेत जास्त रिटर्न देते. डेट फंडात इक्विटी फंडापेक्षा कमी जोखीम असते. त्याच वेळी, शेअर बाजाराच्या चढ-उतारांचा यावर जास्त परिणाम होत नाही. डेट फंडाची एक ठरवलेली मॅच्युरिटी डेट असते. या कारणास्तव इक्विटीपेक्षा पैसा अधिक सुरक्षित असतो. प्रत्येक म्युच्युअल फंडाप्रमाणे, डेट फंडातही अनेक श्रेणी असतात. काही शॉर्ट टर्म सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात. तर दुसरी दीर्घ काळासाच्या बॉन्डमध्ये गुंतवणूक करतात. प्रत्येक कॅटेगिरीत जोखिम ही वेगवेगळी असते.
Tax Saving Tips: गुंतवणूक न करताही वाचवता येईल टॅक्स, जाणून घ्या खास टिप्स