• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • दर महिन्याला परतावा हवा असेल तर 'या' योजनांमध्ये करा गुंतवणूक

दर महिन्याला परतावा हवा असेल तर 'या' योजनांमध्ये करा गुंतवणूक

या योजनांमध्ये महिन्याला किंवा 3 महिन्याला व्याज मिळते. जेणेकरून तुम्ही तुमचा महिन्याचा खर्च भागवू शकता.

  • Share this:
नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी: आजच्या या अस्थिरतेच्या काळात प्रत्येकाला आपल्या गुंतवणुकीचा (Investment) चांगला परतावा (Return) मिळण्याची अपेक्षा असते. ज्येष्ठ नागरिकांना(Senior Citizens) आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा असते. सध्या अनेक गुंतवणूक योजना असून यामध्ये चांगला परतावा मिळतो. अनेक सरकारी योजनांमध्ये (Government Scheme) गुंतवणूक करून देखील देखील तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. यामध्ये सीनियर सिटीझन पंतप्रधान व्यय वंदना योजना (PMVVY), सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीम (SCSS), पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (POMIS) आणि अनेक फिक्स डिपॉझिटमध्ये (FD) गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. या योजनांमध्ये महिन्याला किंवा 3 महिन्याला व्याज मिळते. यामुळे जेष्ठ नागरिकांना फायदा होत असून त्यांचा खर्च भागवण्यासाठी त्यांना या रकमेचा उपयोग होणार आहे. आज आम्ही तुम्हाला या योजनांविषयी माहिती सांगणार असून जेष्ठ नागरिकांसाठी कोणती योजना चांगली आहे हे तुम्हाला समजणार आहे. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS) या योजनेमध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याची गरज आहे. यामध्ये कमीतकमी 1 हजार रुपयांची गुंतवणूक करण्याची गरज असून जास्तीत जास्त साडेचार लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. वर्षाला 6.6% व्याज मिळणार असून महिन्याला याचं व्याज खात्यावर जमा होणार आहे. हे वाचा - Insurance Policy काढताय; मग या 5 गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात जॉईंट अकाउंट उघडून तुम्ही यामध्ये 9 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. पण 1 वर्षांपर्यंत तुम्ही या योजनेतून पैसे काढू शकत नाहीत. 1 वर्षांपासून ते 3 वर्षाच्या आत खातं बंद केल्यास तुम्हाला 2 टक्के दंड भरावा लागणार असून 3 ते 5 वर्षांच्या आत बंद केल्यास 1 टक्के दंड भरावा लागणार आहे. सीनियर सिटीजन्स सेविंग स्कीम या योजनेत ज्येष्ठ नागरिक 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आणखी 3 वर्ष कालावधी वाढवू शकतात. यामध्ये कमीतकमी 1 हजार रुपयांची गुंतवणूक करण्याची गरज असून जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. वर्षाला 7.4% व्याज मिळणार असून दर 3 महिन्यांनी याचं व्याज खात्यावर जमा होणार आहे. या योजनेत तुम्हाला आयकराच्या सेक्शन 80C अंतर्गत आयकरात सूट मिळणार आहे. याचबरोबर 5 वर्षांच्या आत खातं बंद करायचं असल्यास 1 ते दीड टक्के दंड भरावा लागणार आहे. प्रधानमंत्री व्यय वंदना योजना 60 वर्षांपुढील नागरिकांसाठी या योजेनची सुरुवात करण्यात आली होती. 4 मे 2017 मध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये 31 मार्च 2021 पर्यंत नागरिक गुंतवणूक करू शकणार आहेत. 3 वर्षे या योजनेची मुदत असून यामध्ये हव्या असलेल्या कालावधीमध्ये व्याज घेऊ शकतात. याचबरोबर योजनेची 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जमा रकमेवर 75 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. यामध्ये जेष्ठ नागरिकांना 7.4% व्याजदर मिळणार आहे. बँक फिक्स डिपॉजिट देशभरातील अनेक बँकांमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी एफडी(FD) योजना आहेत. खासगी बँकांमध्ये मोठं व्याजदर देखील मिळतं. जेष्ठ नागरिकांना काहीठिकाणी 0.5 ते 1 टक्के जास्त व्याजदर मिळतो. अनेक बँकांमध्ये तुम्ही 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत या योजनेत गुंतवणूक करू शकता. हे वाचा - PM Kisan Samman Nidhi: सरकार 'या' शेतकऱ्यांकडून 2,336 कोटी करणार वसूल 1 वर्षापर्यंतच्या एफडीवर (FD) 4 टक्के ते 5 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.5 ते 6 टक्क्यापर्यंत व्याज मिळते. याचबरोबर अनेक खासगी बँक आणि फायनान्स कंपन्या 8 टक्क्यापर्यंत व्याज देतात.
Published by:news18 desk
First published: