नवी दिल्ली, 25 मे: केंद्र सरकारने असा निर्णय घेतला होता की, पुढील महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अर्थात 1 जूनपासून देशात केवळ बीआयएस हॉलमार्किंग (BIS hallmarking) असणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री होईल. मात्र देशातील कोरोनाची परिस्थिती (Coronavirus in India) लक्षात घेता सरकारने हॉलमार्किंग अनिवार्यता लागू करण्याची तारीख 15 दिवसांनी वाढवली आहे. अर्थात आता 15 जूनपासून ही प्रक्रिया अनिवार्य केली जात आहे. त्यानंतर देशात केवळ हॉलमार्किंग असणारीच ज्वेलरी विकली जाईल. सोन्याच्या शुद्धतेबाबत होणारी फसवणूक कमी करण्यासाठी हा निर्णय फायद्याचा ठरेल, असं जाणकारांचं मत आहे.
सरकारने नवीन व्यवस्था लागू करण्यासाठी बनवली समिती
व्यापाऱ्यांची संघटना असणाऱ्या कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) आणि ज्वेलरी इंडस्ट्रीमधील (Jewelery Industry) काही महत्त्वाच्या व्यक्तींनी सरकारकडे हॉलमार्किंग लागू होण्याची तारीख 1 जून न ठेवता पुढे ढकलण्याची मागणी केली होती. सध्या सरकारने ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे याकरता पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी व्यापाऱ्यांना योग्य वेळ मिळेल. शिवाय सरकारने ही नवीन प्रणाली लागू करण्यासाठी एक समिती देखील बनवली आहे, जी हॉलमार्किंगशी संबंधित सर्व मुद्द्याबाबत निरसन करेल. रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी अशी माहिती दिली आहे की, देशभरातील ग्राहकांना कोणत्याही विलंबाशिवाय हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांची विक्री होणं आवश्यक आहे.
हे वाचा-Gold Price Today: खूशखबर! सोन्याचांदीची झळाळी उतरली, वाचा काय आहे आजचा भाव
शुद्धतेची गॅरंटी वाढणार
हॉलमार्किंह (Hallmarking) अनिवार्य झाल्यानंतर 15 जूननंतर देशभरातील दागिन्यांच्या बाजारपेठेत केवळ हॉलमार्क असलेले 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातील. यामुळं ग्राहकांची फसवणूक टळेल. त्यांना शुद्ध सोन्याचे दागिने मिळतील. हॉलमार्किंगमध्ये BIS चं चिन्हं, कॅरेटबाबत माहिती, दागिना केव्हा बनला त्याचं वर्ष, सराफाचं नाव असेल. BIS हॉलमार्किंग आंतरराष्ट्रीय मापकांशी जोडण्यात आलं आहे. यामुळे सोने व्यापारात पारदर्शकता वाढेल.
घरात आणि लॉकरमध्ये असणाऱ्या दागिन्यांचं करा हॉलमार्किंग
तुमच्याकडे असणाऱ्या जुन्या दागिन्यांचं देखील तुम्ही हॉलमार्किंग करू शकता. तुम्ही कोणत्याही हॉलमार्किंग सेंटरवर जाऊन हे काम पूर्ण करू शकता. मात्र जुन्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी तुम्हाला थोडे अधिक पैसे खर्च करावे लागतील. शिवाय हॉलमार्किंग नसणारे दागिने विकताना थोड्या समस्या देखील येऊ शकतात, कारण तुलनेने त्याचे पैसे काहीसे कमी मिळतील.
हे वाचा-तुम्ही देखील LIC Policy खरेदी करणार असाल तर सावधान! अन्यथा बुडतील सर्व पैसे
फसवणूक केल्यास कारवाई
सोन्याच्या शुद्धतेबाबत किंवा खरेदी-विक्री करताना कोणतीही फसवणूक केल्यास 1 लाखापर्यंत किंवा त्या दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड आकारला जाऊ शकतो. शिवाय 1 वर्षाचा तुरुंगवास देखील होऊ शकतो. तपासणीसाठी सरकारने BIS-Care असं App देखील लाँच केलं आहे. यामध्ये शुद्धता तपासण्याबरोबरच तुम्ही तक्रार देखील नोंदवू शकता. याठिकाणी तुम्हाला हॉलमार्किंग संबंधातील तक्रारी नोंदवता येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold price, Jewellery shop