Home /News /money /

काय सांगता! घर किंवा दुकान खरेदी न करताही तुम्ही होऊ शकता मालमत्तेचे मालक; RETI करेल मदत

काय सांगता! घर किंवा दुकान खरेदी न करताही तुम्ही होऊ शकता मालमत्तेचे मालक; RETI करेल मदत

जाणून घ्या काय आहे RETI

जाणून घ्या काय आहे RETI

रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमध्ये (REIT) म्युच्युअल फंडद्वारेदेखील गुंतवणूक करता येते. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही सहज नफा मिळवू शकता.

    मुंबई, 23 नोव्हेंबर: घर, जमीन, शेती, दुकान आदी स्थावर मालमत्ता हा गुंतवणुकीचा (Investment options) एक उत्तम मार्ग मानला जातो. आपल्या देशात गुंतवणुकीच्या पारंपरिक आणि प्रथम पसंतीच्या पर्यायांपैकी हा एक प्रमुख पर्याय आहे. पूर्वीच्या काळात लोक सोने-चांदी, घर, शेती यात प्राधान्याने गुंतवणूक करत. आता गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड (Mututal funds), शेअर बाजार असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक या पर्यायांकडे वळत आहेत. स्थावर मालमत्ता म्हणजे घर, दुकान इत्यादी सांभाळणं, त्यांची देखभाल करणं, तसंच त्यांची विक्री करणं ही कामं त्रासदायक असतात. तसंच यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. अनेक जण त्यासाठी मोठमोठी कर्जं घेतात. तसंच योग्य मालमत्तेचा शोध घेणं, कागदपत्रांचे व्यवहार करणं इत्यादी गोष्टींना सामोरं जावं लागतं; मात्र त्यातून केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा (Best returns from investment) मिळत असल्यानं आजही अनेक जण त्याला प्राधान्य देतात. यात मिळणाऱ्या परताव्याप्रमाणेच भरभक्कम परतावा देणारा, मात्र कोणतीही कटकट नसलेला एक पर्याय सध्या उपलब्ध आहे, तो म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (Real estate Investment trust) म्हणजेच आरईआयटी (REIT). 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. कोविड स्थिती नियंत्रणात आल्यानं बाजारपेठा पुन्हा पूर्वपदावर आल्या आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्र अर्थात रिअल इस्टेट क्षेत्रातही बरीच सुधारणा झाली आहे. त्यामुळे यात गुंतवणूक करणं लाभदायी ठरणार आहे. त्याकरिता रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हा कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी न करता रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा उत्तम पर्याय आहे. यात गुंतवणूक करण्यासाठी लाखो रुपये असण्याची किंवा कर्ज घेण्याची गरज नाही. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमध्ये (REIT) म्युच्युअल फंडद्वारेदेखील गुंतवणूक करता येते. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही सहज नफा मिळवू शकता. Shih Tzu Cryptocurrency बंपर रिटर्न; अवघ्या दोन तासांत 1000 रुपयांचे झाले 60 लाख यामध्ये एक कंपनी प्रथम रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टची योजना आणते. त्यात म्युच्युअल फंडाप्रमाणे गुंतवणूककांकडून पैसे घेतले जातील आणि त्यातून भाडं देणाऱ्या मालमत्तेत त्यांची गुंतवणूक केली जाईल. यातून तुम्हाला गुंतवणुकीच्या प्रमाणात परतावा मिळेल. या रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे शेअर मार्केटमध्ये याच्या शेअरची नोंद केली जाते आणि दुसरा मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड. त्यांना फंड ऑफ फंड म्हणतात. शेअर बाजारात नोंदणी केलेल्या रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमध्ये, तुम्ही शेअर्सप्रमाणे खरेदी आणि विक्री करू शकता. अगदी एक शेअर खरेदी करूनही ही गुंतवणूक करू शकता. त्याच वेळी, तुम्ही फंड ऑफ फंड्समध्ये तुमच्या फंडाद्वारे ग्लोबल रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमध्ये गुंतवणूक करू शकता, ज्यामध्ये म्युच्युअल फंडाप्रमाणे एक युनिट खरेदी करता येतं. यासाठी किमान 5000 रुपये गुंतवणूक करावी लागते. सध्या आपल्या देशात एम्बसी ऑफिस पार्क्स (Embassy Office Parks), ब्रूकफिल्ड इंडिया (Brookfield India) आणि माइंडस्पेस बिझनेस पार्क्स (Mindspace Business Parks) असे तीन नोंदणीकृत आरईआयटी आहेत. कोटक इंटरनॅशनल, महिंद्रा मॅन्युलाइफ आणि पीजीआइएम हे तीन फंड्स ऑफ फंड आहेत. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांप्रमाणेच, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टवरदेखील भांडवल बाजार नियामक अर्थात सेबीचं (SEBI) नियंत्रण आहे. 'सेबी'च्या नियमानुसार, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टची 80 टक्के रक्कम रेडी-टू-मूव्ह आणि भाड्याने देणाऱ्या मालमत्तांमध्ये गुंतवणं आवश्यक आहे. त्याच वेळी, नोंदणीकृत रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टला त्याच्या कमाईच्या 90 टक्के भाग गुंतवणूकदारांना द्यावा लागतो. गुंतवणूकदाराला लाभांश आणि व्‍याजाच्‍या स्‍वरूपात हा लाभ मिळेल. सध्याचे सर्व रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट व्यावसायिक मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात. पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी कमी होणार? केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारी आयसीआयसीआय (ICICI Securities) सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, व्यावसायिक मालमत्तांमध्ये भाड्याने परतावा मिळवण्यासाठी आरईआयटी हा एक चांगला पर्याय आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आरईआयटीने 99 टक्के भाडं कमावलं आहे, तर याच्याशी संबंधित व्यवसाय दुसऱ्या तिमाहीत 140 टक्क्यांनी वाढून 135 लाख चौरस फूट झाला आहे. या वाढीमुळे, असं स्पष्टपणे म्हणता येईल, की येत्या काही दिवसांत हा व्यवसाय दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे. त्याचाही लाभ या व्यवसायाच्या वाढीला मिळणार आहे. त्यामुळे लाखो गुंतवणूकदारांना प्रत्यक्षात कोणतं घर, दुकान खरेदी न करता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा लाभ मिळवण्याची उत्तम संधी आहे.
    First published:

    Tags: Money, Property, Savings and investments

    पुढील बातम्या