Home /News /money /

अवघ्या दोन तासांत 1000 रुपयांचे झाले 60 लाख रुपये, Shih Tzu Cryptocurrency बंपर रिटर्न

अवघ्या दोन तासांत 1000 रुपयांचे झाले 60 लाख रुपये, Shih Tzu Cryptocurrency बंपर रिटर्न

मुंबई, 23 नोव्हेंबर : क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) म्हणजे अस्थिरतेचं दुसरं नाव असं म्हटलं पाहिजे. याचं कारण म्हणजे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केलेला गुंतवणूकदार रातोरात एकदम श्रीमंत बनू शकतो किंवा अगदी एकाच रात्रीत भिकारीही बनू शकतो. गेल्या काही दिवसांपासून तर क्रिप्टोरन्सीमुळे सगळ्यांनाच नवनवे धक्के बसत आहेत. एका नवीन क्रिप्टोकरन्सीनं सोमवारी (22 नोव्हेंबर) प्रचंड परतावा दिला आहे. शिह त्सु (Shih Tzu) असं त्या करन्सीचं नाव आहे. एका चिनी जातीच्या श्वानावरून या करन्सीचं नाव ठेवण्यात आलं आहे. दोन तासांमध्ये Shih Tzu मध्ये प्रचंड उसळी बघायला मिळाली. इकॉनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार सोमवारी या क्रिप्टोकरन्सीमध्ये जवळपास 6,00,000 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. गुंतवणूकदारांना 59.99 लाख रुपयांचा नफा कॉइनमार्केट कॅपच्या (Coinmarket cap) आकडेवारीनुसार सोमवारी Shih Tzu च्या टोकनमध्ये दोन तासांताच सहा लाख टक्क्यांची वाढ दिसून आली. डिजिटल टोकन Shih Tzu अगदी थोड्या वेळातच 0.000000009105 डॉलरवरून 0.00005477 डॉलरपर्यंत पोहोचलं. या डिजिटल टोकनमध्ये एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीचा मोबदला केवळ दोन तासांत साठ लाखांपर्यंत पोहोचला. एक्स्चेंजमध्ये या डिजिटल टोकनचा व्हॉल्यूमही 65 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी कमी होणार? केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत क्रिप्टोकरन्सीची मागणी जसजशी वाढत आहे, तसे यातले घोटाळे आणि फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळेच कोणत्याही प्रकारच्या क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्याआधी त्याबद्दल पूर्ण माहिती करून घेणं आवश्यक आहे. बनावट क्रिप्टो एक्स्चेंज आणि टोकनची सोशल मीडियावर प्रचंड रेलचेल आहे. या बनावट क्रिप्टोकरन्सी अगदी थोड्या दिवसांत तुम्हाला श्रीमंत बनण्याचं स्वप्न दाखवतात. अगदी थोड्या काळातच ज्यांना खूप पैसा कमवायचा आहे, असे गुंतवणूकदार किंवा अगदी गुंतवणूक न करणारेही नेहमीच फसवणूक करणाऱ्यांच्या रडारवर असतात. क्रिप्टोकरन्सीचा व्यवसाय हा पूर्णपणे स्वतंत्र व्यवसाय आहे. त्यावर सरकारचाही अंकुश नाही कंवा अन्य कोणत्याही बँकेचं नियंत्रण नाही. त्यामुळेच अनेकदा त्याचा गैरफायदा घेतला जातो. कोणत्याही कॉइनबद्दल खातरजमा करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे. अगदी कमी काळात भरपूर रिटर्नचं खोटं आश्वासन तर दिलं जात नाही ना हे आवर्जून तपासून बघावं. Multibagger Stock : वर्षभरात अवघ्या 6 रुपयांचा स्टॉक 188 रुपयांवर, 3000 टक्के रिटर्न क्रिप्टो स्वस्तात देण्याचं आश्वासन देणारे स्कॅमर संभाव्य गुंतवणूकदारांच्या बँक अकाउंटच्या खात्रीसाठी त्यांना काही कॉइन पाठवायला सांगतात. तुमच्या बँक अकाउंटशी संबंधित माहिती मिळवण्याचा ते प्रयत्न करत असतील, तर ते कॉइन पूर्णपणे बनावट, खोटं आहे हे नक्की. तज्ज्ञांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. काही हॅकर्स प्रसिद्ध व्यक्तींची सोशल मीडिया पेज हॅक करतात आणि त्या माध्यमातून कोणत्यातरी विशेष क्रिप्टोमध्ये त्वरित भलामोठा नफा मिळवून देण्याचं आश्वासन देतात. अशा प्रकारे खोटी आश्वासनं आणि दावे करणाऱ्या गुंतवणूकदारांपासून अगदी सावधान राहिलं पाहिजे. त्यासाठीच क्रिप्टोबद्दल पूर्ण माहिती घेऊनच गुंतवणूक करावी.
First published:

Tags: Cryptocurrency, Investment, Money

पुढील बातम्या