मुंबई, 26 फेब्रुवारी: आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावं असं प्रत्येकाला वाटतं. म्हणूनच लोक वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिस देखील अनेक प्रकारच्या बचत योजना चालवते. देशातील कोट्यवधी लोकांनी पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. कारण त्यात गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहते असं लोकांना वाटतं. पोस्ट ऑफिसच्या अनेक प्रसिद्ध योजना आहेत, त्यापैकी एक म्हणजे सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना. ही योजना विशेषतः ग्रामीण भागासाठी आहे.
10 लाख रुपयांपर्यंतचे इंश्योरेंस
19 ते 45 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेत 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा उपलब्ध आहे. या योजनेत दोन मॅच्युरिटी पीरियड आहेत. पॉलिसीधारक 15 वर्षे किंवा 20 वर्षांचा मॅच्युरिटी पीरियड निवडू शकतो.
पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्किममध्ये केवळ 100 रुपयांचीही करता येईल गुंतवणूक, मिळेल चांगला परतावा
पैसे मिळतात परत
15 वर्षांच्या मॅच्युरिटी पीरियड अंतर्गत, 6,9 आणि 12 वर्षे पूर्ण झाल्यावर विम्याच्या रकमेच्या 20-20 टक्के रक्कम परत मिळेल. तर, 20 वर्षांच्या मॅच्युरिटीवर, विमाधारकाला 8, 12, 16 वर्षे पूर्ण झाल्यावर पैसे परत मिळतात. उर्वरित 40 टक्के रक्कम मॅच्युरिटी झाल्यावर बोनससह मिळते.
Post Office च्या ‘या’ स्किमने व्हाल मालामाल! निश्चित कालावधीच पैसे होतील डबल25 वर्षांच्या व्यक्तीने 7 लाख रुपयांच्या विमा रकमेसह 20 वर्षांची पॉलिसी घेतल्यास, त्याला दररोज 95 रुपये प्रीमियम भरावा लागेल. हे एका महिन्यात 2850 रुपये आणि 6 महिन्यांत 17,100 रुपये होतात. मॅच्युरिटी झाल्यावर ही रक्कम 14 लाख रुपये होईल.
14 लाख कसे मिळतील?
20 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 7 लाख रुपयांच्या सम एश्योर्डसह 8 वे, 12 वे आणि 16 व्या वर्षात ठरलेल्या रकमेच्या 20 टक्के कॅशबॅकच्या रुपात मिळतात. सात लाख रुपयांची 20 टक्के रक्कम 1.4 लाख रुपये आहे. तीन वेळा दिल्यानंतर ही एकूण रक्कम 4.2 लाख रुपये होते. त्यानंतर 20 व्या वर्षी तुम्हाला 2.8 लाख रुपये मिळतील. यासह, निश्चित कालावधीची रक्कम पूर्ण होईल. यानंतर, तुम्हाला वार्षिक 48 रुपये प्रति हजार बोनस मिळेल. 20 वर्षांत ही रक्कम 6.72 लाख रुपये होईल. अशा प्रकारे, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 9.52 लाख रुपये मिळतील. मनी बॅक आणि मॅच्युरिटी मिळून मिळून 13.72 लाख रुपये असतील.