Scam 1992च्या हर्षद मेहताने बजेट 2021 बद्दल सांगितलं होतं खरं भविष्य? VIDEO VIRAL

Scam 1992च्या हर्षद मेहताने बजेट 2021 बद्दल सांगितलं होतं खरं भविष्य? VIDEO VIRAL

Scam 1992 या वेब सिरीजमधील एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Budget 2021) सादर केल्यानंतर सर्वत्र या व्हिडीओची चर्चा आहे

  • Share this:

मुंबई, 03 फेब्रुवारी: गेल्या वर्षी आलेल्या स्कॅम 1992 (Scam1992) या वेबसीरीजमध्ये शेअर मार्केटमध्ये झालेला आतापर्यंत झालेला सर्वात मोठा घोटाळा दाखवण्यात आला होता. शेअर मार्केटमधील दलाल दिवंगत हर्षद मेहता (Harshad Mehta) यानी 1992 मध्ये कशा पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये (Share Market) घोटाळा करून फसवणूक केली होती याचं चित्रण दाखवण्यात आलं आहे. याचबरोबर या वेब सिरीजमधील एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Budget 2021) सादर केल्यानंतर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून यामध्ये हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ज्या पद्धतीने शेअर मार्केटने (Share Market) उसळी घेतली आहे त्याचं हुबेहूब चित्रण करण्यात आलं आहे. या सिरीजमध्ये हर्षद मेहता याची भूमिका साकारणाऱ्या प्रतीक गांधी याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून अर्थसंकल्प (Union Budget) सादर झाल्यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया दिली होती. यामध्ये त्याने या अर्थसंकल्पनांतर शेअर मार्केटमध्ये तेजी येणार असल्याचं म्हटलं होतं. या व्हिडीओत ज्या पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे अगदी तसंच या अर्थसंकल्पाच्या वेळी देखील घडलेलं दिसून येत आहे. त्यामुळे त्याने या सीरिजमध्ये बोललेलं वाक्य खरं झालं आहे, अशीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.

(हे वाचा-बाबा आणि ड्रामा; Bigg Boss च्या घरात कायमच वादात राहिले स्वामी ओम)

या व्हिडीओमध्ये तो हा अतिशय उत्तम अर्थसंकल्प असल्याचं म्हणत आहे. सरकारने मार्केटमध्ये काय हवं आहे याकडं लक्ष दिलं आहे. उदारीकरणाची (liberalization) ही फक्त सुरुवात असून भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहनदेखील तो या व्हिडीओमध्ये करताना दिसून येत आहे. त्यामुळे त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी पाहायला मिळणार असल्याचं देखील तो या व्हिडीओच्या शेवटी म्हणताना दिसून येत आहे. त्यामुळं या सीरिजच्या लेखकांनी या अर्थसंकल्पाचे योग्य भविष्यवाणी केली की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असताना सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. 2 ते 3 तासांच्या अंतरात सेंसेक्समध्ये (Sensex) 2 हजारांची वाढ होऊन तो 48 हजारांच्या पार गेलेला पाहायला मिळालं तर निफ्टीमध्ये (Nifty) देखील 450 अंकांची वाढ होऊन त्याने 14 हजारांचा टप्पा ओलांडला. यामुळं या व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे गोष्टी या अर्थसंकल्पादरम्यान घडून येताना दिसून येत होत्या. सीतारामन यांनी पुढील आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट (Fiscal Deficit) भरून काढण्यासाठी भांडवली खर्चामध्ये (Capital Expenditure) वाढ करून या आर्थिक वर्षासाठी ते 5.54 कोटी रुपये करण्याची घोषणा केली आहे. मागील आर्थिक वर्षासाठी ते 4.39 लाख कोटी रुपये इतकं होतं. त्यामुळं या वर्षी सामान्य मध्यमवर्गीयाला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु यामध्ये सामान्य नागरिकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 3, 2021, 4:03 PM IST

ताज्या बातम्या