नवी दिल्ली, 23 जून : 10 दिवसात पैसे दुप्पट जिंव्हा महिनाभरात पैसे तिप्पट असे फसवे प्लॅन्स तुमच्या कानावर नेहमीच पडत असतील. आम्ही आज तुम्हाला एलआयसीच्या (LIC) एका खऱ्याखुऱ्या आणि तुम्हाला लाभदायी असलेल्या प्लॅनबद्दल माहिती सांगतोय. हा असा प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्ही दररोज 200 रुपयांची गुंतवणूक करून 20 वर्षानंतर 28 लाख रुपये कमवू शकता. एवढंच नव्हे तर या पॉलिसीमध्ये 15,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन देखील दिली जाते. या प्लॅनचे नाव आहे जीवन प्रगती स्कीम (Jeevan Pragati Scheme). चला तर मग जाणून घेऊया या प्लॅनबद्दल.
या योजनेचा शेअर मॉर्केटशी संबंध नाही
सम अश्योर्ड (Sum Assured) म्हणजे पॉलिसी संपल्यावर मिळणारी रक्कम किंवा त्या व्यक्तीचा दरम्यान मृत्यु झाला तर मिळणारी रक्कम. या पॉलिसीमध्ये तुम्ही जेवढ्या किमतीचे सम अश्योर्ड (Sum Assured) घेता, त्याच्या व्याजात भर पडून वाढ होते आणि पॉलिसी पूर्ण होईपर्यंत तुमची ती रक्कम दुप्पट होते. ही एक नॉन लिंक्ड पॉलिसी (Non Linked Policy) आहे. यामुळे या पॉलिसीचा शेअर मॉर्केटशी (share market) काहीच संबंध नाही. या प्लॅनमध्ये कमी काळात गुंतवणूक करून अनेक फायदे मिळतील. हा एंडोमेंट प्लॅन एकाच वेळी आपल्याला सुरक्षा आणि बचत देतो.
हे वाचा - Indian Airforce मध्ये मेगा भरती; टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल पदांसाठी पदभरती
पॉलिसीची वैशिष्ट्यं
पॉलिसीमध्ये दर पाच वर्षांनी रिस्क कव्हर वाढते. सुरुवातीचे पाच वर्ष सम अश्योर्ड तेवढेच राहते. यानंतर सहाव्या वर्षापासून ते 10 वर्षांपर्यंत ही रक्कम 25% टक्क्यांहून 125% होते. त्याचप्रमाणे 11 व्या वर्षापासून 15 व्या वर्षापर्यंत सम इंश्योर्ड 150% होते. तर, 16 व्या वर्षापासून ते 20 व्या वर्षापर्यंत सम इंश्योर्ड बेसिक सम इंश्योर्डचा 200 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
म्हणजेच तुम्ही 2 लाख रुपयांची पॉलिसी घेतली तर पहिल्यात पाच वर्षात डेथ बेनिफिटसाठी 2 लाख कव्हरेज, 6 ते 10 वर्षांसाठी 2.50 लाख कव्हरेज, 11 ते 15 वर्षांसाठी कव्हरेज 3 लाख आणि 16 ते 20 वर्षांसाठी 4 लाख रुपये कव्हरेज मिळेल. म्हणजेच मूळ रक्कम दुप्पट होते. शिवाय याच्या माध्यमातून अपघाती मृत्यु (Accidental Death)आणि अपंगत्वाचा राइडर उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी जास्त प्रीमियम भरावा लागेल.
प्रीमियमबद्दल माहिती
या प्लॅनच्या माध्यमातून 15 लाख रुपयांची सम अश्योर्ड आणि 200 रुपये गुंतवणूक करून 20 वर्षांनी तुम्हाला 28 लाख रुपये मिळतील. ही रक्कम थोडीफार कमी जास्त होऊ शकते. एखाद्या व्यक्तीने 30 वर्ष वयात एलआयसी जीवन प्रगती प्लॅनमध्ये प्रीमियम भरणं सुरू केल्यास वर्षाला जवळपास 73,898 रुपयांचा प्रीमियम (Premium) द्यावा लागेल. म्हणजेच एका दिवसाचे 202 रुपये भरावे लागतील. 50 वर्षात तुम्ही जो प्रीमियम भरलाय ती रक्कम, लॉयल्टी बोनस आणि अॅडिशनल बोनस मिळून 28 लाख रुपयांपर्यंत होते.
पॉलिसीसाठी पात्रता
- किमान वय - 12
- कमाल वय - 45
- मॅक्झिमम मॅच्योरिटी उम्र - 65
- प्रीमियम पे मोड: वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मासिक
- ग्रेस पीरियड 15 ते 30 दिवस
- पॉलिसी टर्म: 12 ते 20 वर्ष
- मिनिमम सम अश्योर्ड: 1,50,000
- मॅक्झिमम सम अश्योर्डला कोणतीच मर्यादा नाही
- लोन सुविधा: तीन वर्षांनंतर
- तसंच पॉलिसी तीन वर्षांनंतर सरेंडर करता येते.
- पॉलिसी लॅप्स झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत उर्वरित प्रीमियम भरून रिव्हाईव्ह करू शकता.
तुम्ही देखील एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या पॉलिसीमध्ये दीर्घ काळ गुंतवणूक करून चांगली रक्कम मिळवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, LIC, Money, Policy plans